बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ हिचा आज वाढदिवस. कॅट आज तिचा 37 वा वाढदिवस साजरा करतेय. गेल्या 17 वर्षांपासून ती इंडस्ट्रीत आहे आणि या 17 वर्षांत तिने फार मोठा पल्ला गाठला आहे. सलमान खान, शाहरूख खान, आमिर खान, अक्षय कुमार अशा अनेक सुपरस्टार्ससोबत तिने काम केले.याच कतरिनाबद्दल एक गोष्ट कदाचित तुम्हाला ठाऊक नसेल. होय, याच कतरिनाच्या नादात जॅकी श्रॉफ यांना त्यांचा बंगला गहाण ठेवावा लागला होता.तर जॅकीदाच्या करिअरमध्ये एक काळ असा आला जेव्हा त्यांच्याकडे एकही चित्रपट नव्हता. शिवाय त्यांना कास्ट करण्यात कोणालाही रस नव्हता. अशात जॅकी श्रॉफ यांनी स्वत:च एक चित्रपट प्रोड्यूस करण्याचा विचार केला. हा चित्रपट दुसरा-तिसरा कुठलाही नसून,कतरिना कैफ हिचा डेब्यू सिनेमा ‘बूम’ होता.
या चित्रपटाच्या माध्यमातून कतरिना कैफला लॉन्च करण्याचा निर्णय जॅकींनी घेतला. एवढ्या सुंदर अभिनेत्रीला लॉन्च केल्यास तरुण पिढी तिला बघण्यासाठी नक्कीच सिनेमागृहात पोहोचेल, असा त्यांचा कयास होता. मात्र जॅकीदांचा हा डाव नेमका फसला. सेन्सॉर बोर्डाने या चित्रपटाला पहिला जोरदार धक्का दिला. सेन्सॉर या चित्रपटाला बी ग्रेड चित्रपटांच्या कॅटेगिरीमध्ये टाकले. कारण चित्रपटात खूपच इंटीमेट सीन्सचा भडीमार होता.
अखेर जॅकी श्रॉफ यांना त्यांचा बंगला गहाण ठेवला. त्यांच्या या चित्रपटाला डिस्ट्रिब्यूटर्सही खरेदी करण्यास तयार नव्हते. या चित्रपटानंतर जॅकी आणि कतरिना या दोघांच्या नात्यात मतभेद निर्णाण झाले होते. एकंदर काय तर कतरिनाचे करिअर घडविण्याच्या नादात स्वत: जॅकी श्रॉफ बरबाद झाले होते.