Join us

सीमा हैदरला 'बिग बॉस 17' ची ऑफर? खरं की अफवा; जाणून घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2023 16:22 IST

सीमा हैदरही बिग बॉस आणि कपिल शर्मा शोमध्ये जाणार अशा चर्चांना उधाण आलंय.

पाकिस्तानातूनभारतात आलेली सीमा हैदर (Seema Haider) लवकरच बिग बॉस १७ मध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या. बिग बॉस १७ मध्ये कोण कोण येणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय. सीमा हैदरही बिग बॉस आणि कपिल शर्मा शोमध्ये जाणार अशा चर्चांना उधाण आलंय. यावर आता सीमा हैदरनेच स्वत:च खुलासा केला आहे. 

पाकिस्तानी सीमा हैदर आणि भारताचा सचिन मीणा यांच्या लव्हस्टोरीची अनेक दिवसांपासून चर्चा आहे. पब जी गेम खेळत असताना दोघांमध्ये ओळख झाली. ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले. सचिनच्या प्रेमाखातर सीमा हैदरने आपल्या चार मुलांना सोडून थेट भारत गाठला. सीमा भारतात चांगलीच फेमस झाली. सीमा हैदरचे वकील एपी सिंहने सांगितले की, 'द कपिल शर्मा शोची ऑफर आली होती. मात्र कायदेशीररित्या त्यांचं कार्यक्रमात सहभागी होणं योग्य नाही. सीमाची सध्या चौकशी सुरु आहे. अशावेळी तिचं कोणत्याही रिअॅलिटी शोमध्ये जाणं योग्य नाही.'

सचिन आणि सीमा हैदरच्या प्रेमकहाणीवर 'कराची टू नोएडा' हा सिनेमा बनतोय. सिनेमाचं थीम साँग 'चल पडे है हम' नुकतंच रिलीज झालं. भारतात आल्यानंतर सीमा हैदर भारतीय संस्कृतीचं पालन करत आहे. सीमाला केवळ चित्रपट किंवा शो नाही तर राजकीय पार्ट्याचंही आमंत्रण आलं. 

टॅग्स :सलमान खानबिग बॉसटेलिव्हिजनभारतपाकिस्तान