Join us
Daily Top 2Weekly Top 5

लोकप्रिय रॅपर MC Stanच्या आयुष्यात नेमकं घडतंय तरी काय? नव्या पोस्टमुळे चाहत्यांना सतावतेय चिंता

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2024 15:45 IST

लोकप्रिय रॅपर एमसी स्टॅन सतत चर्चत आहे.

लोकप्रिय रॅपर एमसी स्टॅन सतत चर्चत आहे. सोशल मीडियावर त्याचा मोठा चाहतावर्ग आहे. 'बस्ती की हस्ती' म्हणून ओळखला जाणारा एमसी स्टॅन सध्या कठीण काळातून जात आहे. काही दिवसांपुर्वी एक पोस्ट करत त्याने देवाकडे मृत्यू मागितला होता. त्यामुळे त्याचे चाहते काळजीत पडले होते. आता पुन्हा एमसी स्टॅन एक स्टोरी शेअर केली आहे. ज्यामुळे चाहते त्याबद्दल काळजी व्यक्त करत आहेत. लोकप्रिय रॅपरने आता पुन्हा आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये काय लिहिलं? हे जाणून घेऊया. 

एमसी स्टॅन गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वित्रित्र इन्स्टाग्राम स्टोरी शेअर करत आहे.  नुकतेच एमसी स्टॅनने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर  'या अल्लाह बस मौत दो', असं कॅप्शन लिहून दुआ मागतानाचा इमोजी शेअर केला होता. आता पुन्हा त्याने 'थकलो' अशी स्टोरी शेअर केली आहे. यामुळे त्याच्या चाहत्यांमध्ये चिंताजनक वातावरण तयार झालं असून अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. 

एमसी स्टॅन अशा पोस्ट का करत असावा, याचे उत्तर मिळालेले नाही. मात्र चाहत्यांमध्ये असा अंदाज बांधला जात आहे की, गर्लफ्रेंड बुबा (अनम शेख) सोबत झालेलं ब्रेकअप त्याच्या दु:ख कारण असू शकते. एमसी स्टॅनचं बुबावर खूप प्रेम होतं. दोघे लग्नही करणार होते. पण अचानक त्याचं ब्रेकअप झालं. ९ मे ला एमसी स्टॅनने इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर करत ब्रेकअप झाल्याचं जाहीर केलं होतं. एमसी स्टॅनची ही अवस्था पाहून चाहत्यांच्या जीवाला घोर लागला आहे. 

एमसी स्टॅन हा लाखो रुपयांच्या संपत्तीचा मालक आहे. फक्त तीन ते चार वर्षांमध्ये त्याने स्वतःच्या मेहनतीवर प्रसिद्धी व श्रीमंती मिळवली आहे. अनेकदा सोशल मीडियावर त्याचे महागडे दागिने, बूट याची बरीच चर्चा रंगताना दिसते. एम सी स्टॅनचं खरं नाव अल्ताफ शेख असं आहे. तो फक्त 23 वर्षांचा आहे. पुण्यातल्या ताडीवाला रोड या भागात स्टॅनचं बालपण गेलं. गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या या भागात लहानाचा मोठा झालेल्या स्टॅनने सातवीतच रॅपर व्हायचं ठरवलं होतं. आज त्याच्या रॅपचे जगभरात चाहते आहेत.  

टॅग्स :सेलिब्रिटीबॉलिवूडसोशल मीडिया