Join us
Daily Top 2Weekly Top 5

Vidya Balan: 'भूल भुलैय्या 2' साठी विद्या बालनने का दिला होता नकार? स्वत:च केला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2024 09:24 IST

भूल भुलैय्या २ मध्ये काम करायला विद्या बालनला वाटलेली भीती?

यंदा दिवाळीच्या मुहुर्तावर 'भूल भुलैय्या 3' (Bhool Bhulaiya) रिलीज होणार आहे. या सिनेमाच्या तिसऱ्या भागात ओरिजनल मंजुलिका म्हणजेच विद्या बालनही परतली आहे. शिवाय तिच्या जोडीला माधुरी दीक्षित सुद्धा आहे. 'भूल भुलैय्या' च्या दुसऱ्या भागात विद्या बालन, अक्षय कुमार दिसले नाहीत. कार्तिक आर्यनने ही फ्रँचायजी पुढे नेली. विद्या बालनची (Vidya Balan)  तिसऱ्या भागात पुन्हा एन्ट्री कशी झाली याचा नुकताच खुलासा झाला. 

'भूल भुलैय्या 3' मधील 'आमी जे तोमार 3.0' गाण्याच्या लाँचवेळी निर्माते भूषण कुमार म्हणाले, "मी भूल भुलैय्या 2 साठी विद्याला संपर्क केला होता. पण तिने नकार दिला. जेव्हा आम्ही ट्रेलर लाँच करत होतो त्यात तरी याचा भाग व्हा अशी मी तिला विनंती केली. म्हणून तिने ट्रेलर पोस्ट केला होता. तिला ट्रेलर खूप आवडला आणि सिनेमाही आवडला. मग तिने मला सांगितलं की ती तिसरा सिनेमा नक्कीच करेल."

तर विद्या बालन म्हणाली, "मी खूप घाबरले होते. कारण भूल भुलैय्या सिनेमाने मला खूप काही दिलं आहे. मी म्हटलं जर माझ्याकडून काही चूक झाली तर सगळ्यावर पाणी फिरेल. मी अनीस बज्मी भाईंना सांगितलं होतं की मी रिस्क घेऊ शकत नाही. पण जेव्हा भूल भुलैय्या ३ साठी ते माझ्याकडे आले तेव्हा मला स्क्रीप्ट खूप आवडली. मी तर अनीस आणि भूषणसोबत काम करण्यासाठी आतुर होते. आणि माधुरी दीक्षित असणार हे तर सोन्याहून पिवळं. अनीस बज्मी हे तर एंटरटेन्मेंट किंग आहेत."

'भूल भुलैय्या 3' १ नोव्हेंबर रोजी रिलीज होत आहे. सिनेमात माधुरी दीक्षित, कार्तिक आर्यन, तृप्ती डिमरी, अश्विनी काळसेकर, राजपाल यादव, संजय मिश्रा यांच्या भूमिका आहे. या हॉरर कॉमेडी सिनेमाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. 

टॅग्स :विद्या बालनबॉलिवूडभूल भुलैय्या