Join us

'या' प्रसिद्ध अभिनेत्याच्या नकारामुळे सलमानला मिळाला 'मैने प्यार किया'; बऱ्याच वर्षाने अभिनेत्याने केला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2023 12:15 IST

Maine pyaar kiya: 'मैंने प्यार किया'साठी सर्वात प्रथम मला विचारणा करण्यात आली होती. मात्र, मी त्या सिनेमासाठी नकार दिला, असं या अभिनेत्याने सांगितलं.

बॉलिवूडच्या इतिहासातील तुफान लोकप्रिय झालेला चित्रपट म्हणजे 'मैंने प्यार किया' (maine pyaar kiya). अभिनेता सलमान खान (salman khan) आणि भाग्यश्री (bhagyshree) यांची मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट प्रचंड गाजला.  या सिनेमातूनसलमान खान खऱ्या अर्थाने प्रकाशझोतात आला. मात्र, या सिनेमासाठी सलमान पहिली पसंती नव्हता.

प्रसिद्ध बंगाली कलाकार प्रोसेनजीत चॅटर्जी याने अलिकडेच एका मुलाखतीत या सिनेमाविषयी मोठं वक्तव्य केलं. 'मैंने प्यार किया'साठी सर्वात प्रथम मला विचारणा करण्यात आली होती. मात्र, मी त्या सिनेमासाठी नकार दिला, असं प्रोसेनजीतने सांगितलं.

प्रोसेनजीत लवकरच ज्युबिली या  अॅमेझॉन प्राइम पीरियड ड्रामामध्ये झळकणार आहे. त्यानिमित्ताने त्याने एक मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याने मैंने प्यार कियाविषयी भाष्य केलं.

“विजयता पंडितसोबतचा माझा 'अमर संगी' हा बंगाली चित्रपट सुपरहिट ठरला होता. त्याच्यानंतर माझ्याकडे अन्य चित्रपटांसाठीच्या तारखा बूक झाल्या होत्या. मला ‘मैने प्यार किया’ चित्रपट करायला आवडला असता, पण माझ्याकडे तारखा नसल्यामुळे मला हा सिनेमा सोडावा लागला, असं प्रोसेनजीत म्हणाला. 

टॅग्स :सलमान खानबॉलिवूडसिनेमासेलिब्रिटीभाग्यश्री