Join us

अभिनेत्रीचं 'फॅट टू फिट' ट्रान्सफॉर्मेशन, ऋतिक रोशननं केलं कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2025 16:24 IST

आज जबरदस्त हॉट दिसणारी ही अभिनेत्री काही वर्षांपुर्वी कशी होती, याचे काही फोटो तिने स्वत:च सोशल मिडियावर शेअर केले आहेत.

 Hrithik Roshan Praises Shreya Chaudhry : अभिनेत्री श्रेया चौधरीच्या वेबसीरिज 'बंदिश बँडिट्स सीझन २'ला प्रेक्षकांचं प्रेम मिळत आहे. तिचा अभिनय प्रेक्षकांना पसंत पडला आहे. सध्या सगळीकडे  श्रेया चौधरीची चर्चा पाहायला मिळतेय.  श्रेयाच्या दमदार अभिनयासोबतच तिच्या 'फॅट टू फिट' ट्रान्सफॉर्मेशनचंही कौतुक होत आहे. आता तर थेट बॉलिवूडचा सर्वांत फिट अभिनेता म्हणून ओळखला जाणाऱ्या हृतिक रोशनने तिची प्रशंसा केली आहे. 

श्रेया चौधरीने नुकतंच तिच्या सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत फिटनेस ट्रान्सफॉर्मेशनबद्दल सांगितलं होतं. यावेळी तिनं एक फॅन गर्ल म्हणून ऋतिक रोशनबद्दल तिचं प्रेम व्यक्त केलं होतं. श्रेया तारुण्यात तिच्या वाढत्या वजनामुळे त्रस्त होती. पण, ऋतिक रोशन याचा फिटनेस प्रवास ऐकल्यानंतर तिच्या आयुष्याला एक नवीन वळण मिळाल्याचं श्रेयानं पोस्ट करत सांगितलं होतं.  ऋतिक रोशन हा प्रेरणास्थानी होता, त्याच्यामुळे 'फॅट टू फिट' असा बदल साध्य करता आल्याचं तिनं म्हटलं होतं.

श्रेयाच्या पोस्टवर थेट ऋतिक रोशन याने प्रतिक्रिया दिली आहे. त्याने कमेंट करत लिहलं, "तू चॅम्पियन आहेस. बघ, तू काय कमावलंय! तुझ्यामुळे मलाही प्रेरणा मिळाली, धन्यवाद". तर ऋतिकच्या या कौतुकाने श्रेया भारावल्याचं पाहायला मिळालं. तिच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर श्रेया चौधरी लवकरच 'द मेहता बॉयज' मध्ये अविनाश तिवारीसोबत झळकणार आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन बोमन इराणी करणार आहेत. हा चित्रपट 2025 मध्ये प्रदर्शित होणार आहे.

टॅग्स :सेलिब्रिटीबॉलिवूडहृतिक रोशनवेट लॉस टिप्स