Join us

बॅक टू बॅक फ्लॉप सिनेमे दिल्यानंतर अक्षय कुमारला चाहत्यांनी दिला 'हा' सल्ला, अभिनेता म्हणाला-"मला गर्व आहे की..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2025 12:31 IST

'स्काय फोर्स' सिनेमाच्या प्रेस कॉन्फरन्सला अक्षयने फ्लॉप सिनेमानंतर लोकांनी काय सल्ला दिला? यावर भाष्य केलंय (akshay kumar, sky force)

अक्षय कुमारबॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेता. अक्षयला आपण विविध सिनेमांमधून अभिनय करताना पाहिलंय. अक्षयचे गेल्या काही महिन्यात प्रदर्शित झालेले सिनेमे बॉक्स ऑफिसवर इतके चालले नाहीत. अक्षय कुमारचे २०२४ मध्ये रिलीज झालेले सिनेमेही बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरले. अशातच काल 'स्काय फोर्स' सिनेमाच्या ट्रेलर लाँचला बॅक टू बॅक फ्लॉप सिनेमे देणाऱ्या अक्षयने त्याच्या मनातील भावना शेअर केली.

अक्षयला चाहत्यांनी दिला हा सल्ला

अक्षय कुमारने 'स्काय फोर्स'च्या ट्रेलर लाँचला त्याच्या फ्लॉप सिनेमांबद्दल सांगितलं. अक्षय म्हणाला की, "हे माझ्यासोबत पहिल्यांदा घडतंय असं काही नाहीये. आपण खूप जास्त मेहनत केली पाहिजे ही चांगली गोष्ट आहे. मी स्वतःला आणि इतरांनाही एवढंच सांगतो की खूप मेहनत करा. मला लोक सल्ला देतात की मी आता वर्षातून फक्त २ सिनेमे केले पाहिजेत. पण जर मी जास्त काम करत असेल तर काय हरकत आहे.?"

अक्षय कुमार पुढे म्हणाला की, "माझं संपूर्ण करिअर याच डेडिकेशन आणि मेहनतीने मी घडवलं आहे. मला सांगण्यात आलं की कंटेंटवर आधारीत सिनेमे नको करु. पण मला असं काही करायचं नाही. सरफिरा हा माझा सिनेमा फ्लॉप झाला तरीही मला गर्व आहे की मी तो सिनेमा केला. माझ्या चांगल्या सिनेमांपैकी तो एक सिनेमा आहे." अशाप्रकारे अक्षयने त्याचं म्हणणं मोकळेपणाने सांगितलं. अक्षयचा नवीन वर्षातील 'स्काय फोर्स' हा पहिला सिनेमा २४ जानेवारी २०२५ ला रिलीज होतोय.

 

टॅग्स :अक्षय कुमारबॉलिवूड