Join us

"बॉलिवूड फेक, वाईट", बाबिल खानचा खळबळजनक व्हिडीओ, डिलीट केलं इंस्टाग्राम अकाउंट

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2025 14:22 IST

बाबिल खाननं भावनिक व्हिडीओ शेअर करत थेट अनन्या पांडे, अर्जुन कपूर यांचं नाव घेतलं...

Babil Khan Emotional Breakdown: बॉलिवूड अभिनेता आणि दिवंगत कलाकार इरफान खान यांचा मुलगा बाबिल खान सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. बाबिलचा खळबळजनक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये बाबिल हा ओक्साबोक्शी रडताना दिसतोय.  त्यानं बॉलिवूड इंडस्ट्रीवर नाराजी व्यक्त केली आहे. तसेच काही कलाकारांची नावं घेत थेट आरोप केले आणि त्यानंतर स्वतःचं इंस्टाग्राम अकाउंटही डिलीट केलं आहे. 

बाबिलचा बॉलिवूडबद्दल बोलताना एक व्हिडीओ त्याच्या इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला होता. पण, त्यानंतर लगेचच बाबिलनं इन्स्टाग्राम डिलीट केलं. सध्या व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये बाबिल म्हणता दिसतोय की, "बॉलिवूड खूपच खराब आणि फेक इंडस्ट्री आहे. मी स्वतः याचा भाग राहिलो आहे. इथे फार थोडे लोक खरे आहेत, जे बॉलिवूडला सुधारण्याचा प्रयत्न करत आहेत". एवढंच नाही तर या व्हिडीओमध्ये बाबिलनं काही कलाकारांची थेट नावं घेतली.  तो म्हणतो, "म्हणजे मला तुम्हाला सांगायचं आहे की शनाया कपूर, अनन्या पांडे, अर्जुन कपूर, सिद्धांत चतुर्वेदी, राघव जुयाल, आदर्श गौरव आणि अगदी अरिजित सिंग सारखे लोक आहेत. अजून बरीच नावे आहेत. बॉलिवूड खूपच बनावट आहे".

बाबिलचं इंस्टाग्राम अकाउंट सध्या अनअवेलेबल (Unavailable) असल्याचं दिसतंय. बाबिलचं नाव सर्च केल्यावर "This page isn't available" असा मेसेज दिसतो आहे. बाबिलच्या या व्हिडीओवर अनेक प्रतिक्रिया उमटल्या. त्याचे काही चाहते चिंतेत सापडले आहेत. बाबिलच्या मानसिक स्थितीबाबत ते काळजी व्यक्त करत आहेत. तर दुसरीकडे काही नेटकऱ्यांनी त्याचा हा व्हिडीओ पीआर स्टंट असावा असं म्हटलं आहे. तर काहींनी त्याचं इन्स्टाग्राम अकाऊट हॅक झालं असावं, असं लिहलंय. तर काहींनी अंदाज लावला की हा भावनिक उद्रेक कदाचित त्याच्या नव्या चित्रपटाच्या प्रमोशनचा भाग असू शकतो. दरम्यान,  बाबिलचं अचानकपणे असं व्यक्त होण्यामागे नेमकं कारण काय?  असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या  या व्हिडीओमागचं सत्य नेमकं काय आहे, हे लवकरच स्पष्ट होईल.  

इरफान खान यांच्या स्मृतिदिनी भावनिक पोस्ट

दरम्यान, काही दिवसांपुर्वी इरफान खान ययांच्या पुण्यतिथीच्या दिवशी बाबिलनं एक हृदयस्पर्शी पोस्ट लिहिली होती. "तुमच्यासोबत, तुमच्याशिवाय, आयुष्य चाललंय. लवकरच मीसुद्धा तिकडे येईन... आणि तुम्हाला घट्ट मिठी मारून रडेन, आणि पुन्हा हसेनही, जसं आपण पूर्वी करत होतो. तुमची खूप आठवण येते", या शब्दात त्यानं आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. बाबिलच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर  त्यानं 'काला' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. या सिनेमातील त्याच्या अभिनयाचं प्रेक्षकांनी कौतुक केलं होतं. तर अलीकडेच तो 'लॉगआउट' यामध्येही  दिसला होता. 

टॅग्स :इरफान खानबॉलिवूडसेलिब्रिटीसोशल मीडिया