Join us
Daily Top 2Weekly Top 5

अभिनेत्री उर्वशी रौतेलाचा ‘संस्कारी लूक’ पाहून नेटिझन्स अवाक्! मंदिरातील व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2024 10:00 IST

उर्वशीचा अनोखा लूक पाहायला मिळतोय. 

आपल्या हॉट आणि बोल्ड लूकमुळे नेहमीच चर्चेत राहणारी अभिनेत्री म्हणजे उर्वशी रौतेला. ती ग्लॅमरस आणि बोल्ड फॅशन सेन्ससाठी ओळखली जाते. सध्या उर्वशी ‘संस्कारी लूक’मध्ये दिसतेय. तिचा एक व्हिडीओ आणि काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत. यामध्ये उर्वशीचा अनोखा लूक पाहायला मिळतोय. 

अयोध्येतील श्रीराम प्राण प्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने देशभरातील वातावरण राममय झालं. राम मंदिराच्या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी देशभरातील अनेक सेलिब्रिटी अयोध्येत पोहोचले होते. पण, जे पोहचू शकले नाहीत. त्यांनी जवळच्या मंदिरात जाऊन देवाचं दर्शन घेतलं. मग यात उर्वशी रौतेला तरी कशी मागे राहिल. बोल्डनेसाठी प्रसिद्ध असलेल्या उर्वशीला अध्यात्मात रस असल्याचं दिसून आलं. 

उर्वशीने सोशल मीडियावर तिचा एक व्हिडीओ आणि काही फोटो शेअर केले. कॅप्शनमध्ये तिनं 'मेरे घर राम आये है' असं लिहलं. उर्वशी रौतेलानं मंदिरात विशेष पूजा केली. यावेळी उर्वशी केशरी रंगाच्या पारंपरिक पोशाखात दिसली. मंदिरातील पुजेच्या व्हिडीओला तिनं 'रामचंद्र की जय' हे गाणं जोडलं. उर्वशीचा हा संस्कारी लूक सध्या सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. तिचा हा लेटेस्ट लूक पाहिल्यानंतर नेटकऱ्यांना धक्काच बसला आहे. तिच्या व्हिडीओ आणि फोटोंवर अनेक प्रतिक्रिया येत आहेत.

टॅग्स :उर्वशी रौतेलासेलिब्रिटीबॉलिवूडअयोध्याराम मंदिर