अभिनेत्री अवनीत कौर(Avneet Kaur)ने पुन्हा एकदा तिच्या इंस्टाग्राम पोस्टवर विराट कोहली(Virat Kohli)ने केलेल्या कमेंटवर आपली प्रतिक्रिया दिली आहे. विराटच्या कमेंटने सोशल मीडियावर खूप खळबळ माजवली होती आणि चाहते तसेच सोशल मीडिया युजर्सनी क्रिकेटपटूवर टीका केली होती. विराट कोहलीने आधीच यावर स्पष्टीकरण दिले आहे, परंतु अवनीतने आता यावर मौन सोडले आहे. अशा वादविवादांमध्ये अडकण्याऐवजी तिला तिच्या करिअरवर लक्ष केंद्रित करायला आवडते.
इंडिया टुडेसोबतच्या संवादात अवनीत कौर म्हणाली की, ''ती अशा गोष्टींना स्वतःवर हावी होऊ देत नाही. ती म्हणाली, "खरं सांगायचं तर, मी फक्त कठोर परिश्रम करत राहते, कारण माझं लक्ष याच गोष्टीवर आहे. मी फक्त अभिनयातच नाही, तर प्रत्येक क्षेत्रात स्वतःला अधिक चांगलं बनवण्याचा प्रयत्न करत आहे. मी इतर गोष्टींवर अधिक लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करते आणि अर्थातच मी माझ्या स्वप्नांना किंवा माझ्या पालकांना अभिमान वाटेल अशा गोष्टी कधीच विसरत नाही."
''ज्या मला विचलित करत नाहीत...''
ती पुढे म्हणाली की, "या काही अशा गोष्टी आहेत ज्या मला विचलित करत नाहीत, कारण जर मी याच गोष्टींवर लक्ष केंद्रित करत राहिले, तर मी पुढे जाऊ शकणार नाही आणि मला ते नको आहे." अवनीतने तिची आई तिचा सर्वात मोठा आधार असल्याचे सांगितले. अवनीत म्हणाली, "ती माझ्या सर्वात चांगल्या मैत्रिणीसारखी आहे. मी तिच्यासोबत प्रत्येक गोष्ट शेअर करते. ती माझी प्रेरणा आहे, ती माझ्यासाठी सर्वकाही आहे. मी तिला अशा गोष्टीसुद्धा सांगते ज्या मी कोणालाही सांगत नाही."
Virat liked Avneet kaur's fanpage pics on Anushka's birthday 😭💀byu/Hell_holder11 inBollyBlindsNGossip
विराट म्हणालेला...
३० एप्रिलला जेव्हा अवनीतने हिरव्या रंगाचा क्रॉप टॉप आणि प्रिंटेड रॅप स्कर्टमध्ये काही फोटो अपलोड केले होते. चाहत्यांनी पाहिले की विराट कोहलीने पोस्टला 'अनलाइक' करण्यापूर्वी 'लाइक' केले होते. यामुळे ऑनलाइन मीम्स आणि प्रतिक्रियांचा पूर आला. त्यानंतर लगेचच, विराटने एका इंस्टाग्राम स्टोरीमध्ये लिहिले, "मला हे स्पष्ट करायचे आहे की माझा फीड साफ करताना, असे दिसते की अल्गोरिदमने चुकून एक इंटरॅक्शन नोंदवली असावी. त्यामागे कोणताही हेतू नव्हता. मी विनंती करतो की कोणीही अनावश्यक गृहीतकं बनवू नये. तुमच्या समजूतदारपणाबद्दल धन्यवाद."