Join us

स्वीडिश अभिनेत्रीच्या प्रेमात पडला आशिष चंचलानी? मराठी सिनेमातही दिसली; डेटिंगच्या चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2025 15:46 IST

आशिष चंचलानीने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत गुडन्यूज दिली आहे.

सोशल मीडिया स्टार आशिष चंचलानी (Ashish Chanchlani) सध्या चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी त्याचा मिस्ट्री गर्लसोबतचा फिरतानाचा फोटो समोर व्हायरल झाला होता. यावरुन आशिष कोणाला डेट करतोय अशी चर्चा सुरु झाली. याआधी आशिषचं ब्रेकअप झालं होतं ज्यामुळे तो अक्षरश: नैराश्यात होता. मात्र आता त्याला प्रेम मिळालं असल्याची चर्चा सुरु होती. दरम्यान आशिषने इन्स्टाग्रामवर मिस्ट्री गर्लसोबतचा रोमँटिक फोटो शेअर केला आहे. 

आशिष चंचलानीने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत गुडन्यूज दिली आहे. त्याने बॉलिवूड अभिनेत्री एली अवरामसोबत (Elli Avrram) रोमँटिक फोटो शेअर केला आहे. त्याने एलीला उचलून घेतलं आहे. एलीच्या हातात गुलाबाच्या फुलांचा गुच्छ आहे. आशिष आणि एलीच्या चेहऱ्यावर कमालीचा आनंद दिसतोय. आशिषने कॅप्शनमध्ये 'Finally' असं लिहिलं असून हार्ट चा इमोजीही दिला आहे. 

आशिषच्या या पोस्टवर अनेक कंटेंट क्रिएटर्सने कमेंट करत त्याचं अभिनंदन केलं आहे. तसंच चाहतेही हा फोटो पाहून जाम खूश झालेत. दरम्यान आशिष खरंच एलीसोबत रिलेशनशिपमध्ये आहे का की हा कोणता पब्लिसिटी स्टंट आहे असाही अनेकांना प्रश्न पडला आहे. 

यावर्षीच्या सुरुवातीपासूनच एली अवराम आणि आशिषच्या अफेअरची चर्चा सुरु झाली होती. दोघं फेब्रुवारीमध्ये elle list च्या इव्हेंटमध्ये दिसले होते. त्यांच्या एकत्रित दिसण्याने चर्चांना उधाण आलं होतं.  तर आशिष चंचलानी मधल्या काळात समय रैनाच्या 'इंडियाज गॉट लेटंट'मुळे झालेल्या वादात अडकला होता. एली अवराम नुकतीच 'इलू इलू १९९८' या मराठी सिनेमात दिसली.

टॅग्स :एली अवरामसेलिब्रिटीरिलेशनशिपबॉलिवूड