Join us
Daily Top 2Weekly Top 5

अर्जुन रामपाल वयाच्या 50 व्या वर्षी चौथ्यांदा झाला बाबा, गर्लफ्रेंडने दिला दुसऱ्या मुलाला जन्म

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2023 09:02 IST

अर्जुन आणि गॅब्रिएलाने अद्याप लग्न केलेले नाही.

फिल्म इंडस्ट्रीतील सर्वात हँडसम अभिनेत्यांपैकी एक म्हणजे अर्जुन रामपाल (Arjun Rampal). अर्जुनचं व्यक्तिमत्वच असं आहे की आजही अनेक तरुणी त्याच्यावर फिदा होतात. अर्जुन गेल्या अनेक वर्षांपासून इंडस्ट्रीत आहे. आता अर्जुन प्रोफेशनल नाही तर वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आलाय. अर्जुन चौथ्यांदा बाबा झाला असून  गर्लफ्रेंड गॅब्रिएलाने काल दुसऱ्या मुलाला जन्म दिला आहे. वयाच्या ५० व्या वर्षी अर्जुन चौथ्यांदा बाबा बनला आहे.

अर्जुनने काल २० जुलै रोजी ट्वीट करत ही गुडन्युज चाहत्यांसोबत शेअर केली. त्याने लिहिले, 'मला आणि माझ्या कुटुंबाला आज एका गोंडस मुलाचं सौभाग्य मिळालं. आई आणि मुलगा दोघेही सुखरुप आहेत.' 

अर्जुन आणि गॅब्रिएला यांची भेट एका कॉमन मित्राच्या माध्यमातून 2018 मध्ये झाली होती. काही महिन्यांनी दोघेही एकमेकांना डेट करायला लागले. 2019 मध्ये कपलने एरिक या पहिल्या मुलाला जन्म दिला. तर आता 2023 मध्ये त्यांनी दुसऱ्या मुलाचंही स्वागत केलं आहे. विशेष म्हणजे दोघांनी अद्याप लग्न केलेलं नाही. अर्जुनला पहिल्या पत्नीकडून दोन मुली आहेत. माहिका आणि मायरा अशी त्यांची नावं आहेत. २०१९ मध्ये त्याने पत्नीला घटस्फोट दिला होता. 

अर्जुनला शेवटचं कंगना रणौतचा सिनेमा 'धाकड' मध्ये पाहिले गेले. हा सिनेमा बॉक्सऑफिसवर फारशी कामगिरी करु शकला नाही. लवकरच अर्जुन अब्बास मस्तानच्या 'पेंटहाऊस' सिनेमात बॉबी देओलसह दिसणार आहे. याशिवाय तो स्पोर्ट्स अॅक्शन फिल्म 'क्रॅक'मध्येही भूमिका साकारणार आहे. यामध्ये विद्युत जामवाल आणि जॅकलीन फर्नांडिस यांचीही मुख्य भूमिका आहे.

टॅग्स :अर्जुन रामपालबॉलिवूडपरिवारगॅब्रिएला डेमेट्रिएड्स