Join us

'प्रेम केलंय तर परिणामही भोगावेच लागतील'; मलायकामुळे त्रस्त झालाय अर्जुन?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2022 18:46 IST

Arjun kapoor: अर्जुन आणि मलायका यांच्या नात्यात जवळपास १२ वर्षांचं अंतर आहे. त्यामुळे अनेकदा त्यांना ट्रोल केलं जातं. परंतु, या ट्रोलर्सकडे या दोघंही दुर्लक्ष करतात.

सध्याच्या काळात बॉलिवूडमधील सर्वात चर्चेत राहणारी जोडी म्हणजे अर्जुन कपूर (arjun kapoor) आणि मलायका अरोरा(malaika arora). अभिनेता अरबाज खानपासून विभक्त झाल्यानंतर मलायकाने अर्जुन कपूरला डेट करण्यास सुरुवात केली. विशेष म्हणजे २०१९ मध्ये या जोडीने त्यांचं नातं सर्वांसमक्ष जाहीरपणे मान्य केलं. त्यामुळे ही जोडी वरचेवर चर्चेत येत असते. अलिकडेच अर्जुनने एक मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याने मलायकाविषयी भाष्य केलं आहे.

अर्जुनची महत्त्वपूर्ण भूमिका असलेला 'एक व्हिलेन रिटर्न्स' या चित्रपटाचा ट्रेलर अलिकडेच प्रदर्शित झाला. या चित्रपटाच्या निमित्ताने अर्जुनने एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्याने प्रेम करण्याचे फायदे व तोटे सांगितले आहेत. 

"तुमच्या कथेत कधी तुम्हाला नायक व्हावं लागतं तर कधी खलनायक. ज्यावेळी तुम्ही एखाद्यावर खरं प्रेम करता त्यावेळी त्याचे परिणामही तुम्हाला भोगावेच लागतात. या परिणामांचं स्वरुप प्रत्येकासाठी वेगवेगळं असतं.पण, तरीसुद्धा तुमचं प्रेम खरं असलं पाहिजे. जर या प्रेमाकडे तुम्ही एका दृष्टीकोनातून पाहिलं तर तुम्ही त्यात हिरो असाल आणि दुसरी बाजू पाहिली तर खलनायकदेखील ठराल", असं अर्जुन म्हणाला.

दरम्यान, विशेष म्हणजे त्याने केलेल्या या वक्तव्यामुळे तो मलायकामुळे त्रस्त झालाय का? असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे. मात्र, अर्जुन हे सारं काही मलायका नव्हे तर त्याच्या चित्रपटाविषयी बोलत होता. अर्जुन आणि मलायका यांच्या नात्यात जवळपास १२ वर्षांचं अंतर आहे. त्यामुळे अनेकदा त्यांना ट्रोल केलं जातं. परंतु, या ट्रोलर्सकडे या दोघंही दुर्लक्ष करतात. अलिकडेच अर्जुनने मलायकासोबत पॅरिसमध्ये त्याचा ३७ वा वाढदिवस साजरा केला.   

टॅग्स :अर्जुन कपूरमलायका अरोरासेलिब्रिटीबॉलिवूड