Join us

मलायकाबरोबरच्या ब्रेकअपनंतर पहिल्यांदाच लग्नाबद्दल बोलला अर्जुन कपूर, नेमकं काय म्हणाला?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2025 09:06 IST

मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर ही बॉलिवूडमधील सर्वाधिक चर्चेत असणारी जोडी होती.

Arjun Kapoor Marriage Plans: अभिनेता अर्जुन कपूर (Arjun Kapoor) सध्या 'मेरे हसबंड की बीवी' ( Mere Husband Ki Biwi) या चित्रपटामुळे चर्चेत आहे. हा चित्रपट २१ फेब्रुवारी रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.यात अर्जुन कपूरसह अभिनेत्री भूमी पेडणेकर (Bhumi Pednekar)आणि रकुल प्रीत सिंग (Rakul Pret Singh) यांच्या मुख्य भूमिका आहेत.नुकताच 'मेरी हसबंड की बिवी' या रोमकॉम चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. या चित्रपटाच्या ट्रेलर लाँच सोहळ्यात अर्जून कपूरनं लग्न आणि ब्रेकअपवर भाष्य केलं. 

'मेरी हसबंड की बिवी' चित्रपटाच्या ट्रेलर लाँच कार्यक्रमात अर्जुन कपूरला तो खऱ्या आयुष्यात कधी लग्न करणार? असा प्रश्न विचारण्यात आला. यावेळी तो म्हणाला, "जेव्हा ते होईल तेव्हा मी तुम्हाला सर्वांना कळवीन. आज आपण चित्रपटाबद्दल बोलूया". अर्जुन कपूर हा कायमच त्याच्या वैयक्तीक आयुष्यामुळे चर्चेत राहिला आहे. मलायकासोबतच्या (Malaika Arora ) ब्रेकअपनंतर तो कुणाला डेट करतोय आणि कधी लग्न करणार हे जाणून घेण्यासाठी त्याचे चाहते हे उत्सुक आहेत.

मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर ही बॉलिवूडमधील सर्वाधिक चर्चेत असणारी जोडी होती. अरबाज खान याच्यासोबतच्या घटस्फोटानंतर मलायकाने अर्जुन कपूरला डेट केले. विशेष म्हणजे दोघेही एकमेकांचे खास फोटो आणि व्हिडीओ हे सोशल मीडियावर शेअर करताना कायमच दिसत.  १३ वर्षांनी मोठी असलेल्या मलायकाच्या प्रेमात अर्जून होता. मात्र, गेल्या वर्षी दोघे वेगळे झाले. आतापर्यंत अर्जुन किंवा मलायका दोघांनीही त्यांच्या वेगळे होण्याचे कारण उघड केलेले नाही.  

टॅग्स :अर्जुन कपूरमलायका अरोरालग्न