Join us
Daily Top 2Weekly Top 5

Tiger 3 मध्ये अरिजित सिंहच्या आवाजाची जादू, 'रुआं रुआं' गाण्याला मिळतोय प्रेक्षकांचा प्रतिसाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2023 10:02 IST

'टायगर 3' चं याआधी 'लेके प्रभु का नाम' हे गाणं रिलीज झालं होतं.

अनेक वर्षांच्या वादानंतर सलमान खान (Salman Khan) आणि अरिजीत सिंह (Arijit Singh) पुन्हा एकदा सोबत आले आहेत. आगामी 'टायगर 3' सिनेमात अरिजीतने गाणी गायली आहेत. सिनेमातील दुसरं गाणं 'रुआं रुआं' नुकतंच रिलीज झालं आहे. अरिजीतचा जादुई आवाज या गाण्यातही झळकतोय. सध्या गाण्याचा केवळ लिरिकल व्हिडिओ रिलीज झालाय.

'टायगर 3' चं याआधी 'लेके प्रभु का नाम' हे गाणं रिलीज झालं होतं. हे गाणंही अरिजीतनेच गायलं आहे. पहिल्या गाण्याला प्रेक्षकांची पसंती मिळाल्यानंतर आता हे 'रुआं रुआं' गाण्याने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. प्रीतमचं म्युझिक आणि इरशाद कामिलचे लिरिक्स यामुळे गाणं दर्जेदार बनलंय. काहीच मिनिटात गाण्याला लाखो व्ह्यूज मिळाले आहेत. 

'टायगर 3' येत्या १२ नोव्हेंबरला रिलीज होणार आहेत. टायगर सिरीजच्या तिसऱ्या भागात इमरान हाश्मी खलनायक असणार आहे. तर 'पठाण' म्हणजेच शाहरुख खान आणि 'कबीर'म्हणजेच हृतिक रोशन यांचा कॅमिओ असणार आहे. चाहते या सर्वांना एकत्र बघण्यासाठी खूप आतुर आहेत. 

टॅग्स :अरिजीत सिंहकतरिना कैफसलमान खानबॉलिवूड