Join us
Daily Top 2Weekly Top 5

अर्चना पूरन सिंह खरेदी करणार ५० कोटींचा नवा बंगला? मढ आयलंडमध्ये मारला फेरफटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2026 17:08 IST

अर्चन पूरन सिंहकडे आधीपासूनच कोट्यवधींची संपत्ती आहे, मड आयलंडमध्ये तिचा कोटींचा बंगला आहे. आता ती तिथेच आणखी नवी गुंतवणूक करणार?

लोकप्रिय अभिनेत्री आणि 'द ग्रेट इंडियन कपिल शो'फेम अर्चना पूरन सिंह सध्या तिच्या आलिशान जीवनशैलीमुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. अर्चनाच्या मढ आयलंडमधील ७० कोटींच्या बंगल्याबद्दल कपिल शर्माच्या शोमध्ये अनेकदा विनोद केले जातात. मात्र आता अर्चना तिथेच अजून एक नवीन बंगला खरेदी करण्याच्या तयारीत आहे. तिचा मुलगा आर्यमनच्या लेटेस्ट व्लॉगमध्ये तिने याबद्दल खुलासा केला असून, या नवीन मालमत्तेची किंमत तब्बल ५० कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे.

आर्यमनने शेअर केलेल्या व्लॉगमध्ये अर्चना, पती परमीत सेठी आणि मुलांसोबत मढ आयलंडमध्ये नवीन बंगले पाहताना दिसत आहे. मढ आयलंडमधील प्रत्येक बंगल्यासमोर प्रशस्त गार्डन, स्विमिंग पूल आणि इतर जागतिक दर्जाच्या सुविधा असल्याने अर्चनाला तिथेच गुंतवणूक करायची आहे. जरी हे बंगले सध्या तिच्या बजेटच्या बाहेर असल्याचे तिने गंमतीने म्हटले असले, तरी त्यापैकी एक खरेदी करण्यासाठी तिचे प्रयत्न सुरू आहेत. यावेळी तिने प्रेक्षकांना आपल्याला आवडलेल्या टॉप-३ बंगल्यांची झलकही दाखवली.

या व्लॉगमध्ये अर्चनाने मड आयलंडमध्ये आपला पहिला बंगला खरेदी करण्याचा किस्साही शेअर केला. ती म्हणाली, "जेव्हा आम्ही इथे पहिले घर घेण्यासाठी आलो होतो, तेव्हा हा भाग पूर्णपणे जंगलासारखा होता. मी सर्व जमिनी पाहिल्या आणि ज्या बंगल्याचा परिसर सर्वात जास्त होता, तो खरेदी करण्याचा निर्णय घेतला." यावेळी तिने परमीतवर विनोद करत सांगितले की, तो आधी फ्लॅटमध्ये राहायचा, त्यामुळे त्याला जमिनींची फारशी समज नव्हती. यावर परमीतने हसत हसत अर्चनाचे म्हणणे खोडून काढले.

अर्चना पूरन सिंह सध्या पती आणि मुलांसोबत मढ आयलंडमधील आलिशान बंगल्यात राहते. विशेष म्हणजे, तिने या बंगल्याच्या शेजारीच मुलगा आर्यमन आणि होणारी सून योगिता बिहानी यांच्यासाठीही एक बंगला घेतला आहे, जिथे ते लिव्ह-इनमध्ये राहतात. आता जो नवीन बंगला अर्चना घेणार आहे, त्यासाठी पती परमीत आणि तिची दोन्ही मुले मिळून पैसे लावणार असल्याचे तिने स्पष्ट केले. "खर्च करण्यासाठी जिगरा लागतो," असेही ती यावेळी म्हणाली.

अर्चना पूरन सिंहच्या एकूण संपत्तीबद्दल (Net Worth) बोलायचे झाले तर, रिपोर्ट्सनुसार ती २३५ कोटी रुपयांची मालकीण आहे. 'द ग्रेट इंडियन कपिल शो'च्या एका एपिसोडसाठी ती १०-१२ लाख रुपये मानधन घेते. २ मे पासून या शोचे पाचवे सीझन सुरू झाले असून अर्चना पुन्हा एकदा खुर्चीवर विराजमान झाली आहे. टेलिव्हिजनसोबतच अर्चना चित्रपटांतूनही मोठी कमाई करते. अलीकडेच ती राजकुमार रावच्या 'टोस्टर' या चित्रपटामध्ये महत्त्वाच्या भूमिकेत झळकली होती.

English
हिंदी सारांश
Web Title : Archana Puran Singh eyes ₹50 crore bungalow in Madh Island?

Web Summary : Archana Puran Singh is reportedly planning to buy a ₹50 crore bungalow in Madh Island. She was seen scouting properties with her family in a recent vlog, hinting at a potential investment near her existing home.
टॅग्स :अर्चना पूरण सिंगबॉलिवूडमुंबईसुंदर गृहनियोजन