Join us
Daily Top 2Weekly Top 5

शाळेत लिपस्टिक कोण लावतं? बिग बींच्या नातीचा Video व्हायरल; नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2023 13:48 IST

आराध्या ऐश्वर्या आणि अभिषेक यांची एकुलती एक लेक आहे.

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांची नात आराध्या बच्चनचा (Aradhya Bachchan) एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. यामध्ये  ती शाळेच्या ड्रेसवर दिसत आहे. तर तिने चक्क लिपस्टिक लावलं आहे. यामुळे ऐश्वर्या आणि अभिषेक बच्चनहीट्रोल होत आहेत. अनेकांनी व्हिडिओवर संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. हा व्हिडिओ आराध्याच्या शाळेतील एका कार्यक्रमादरम्यानचा असल्याची चर्चा आहे. 

आराध्या ऐश्वर्या आणि अभिषेक यांची एकुलती एक लेक आहे. ती आता १२ वर्षांची असून धीरुभाई अंबानी शाळेत शिकते. आराध्या अनेकदा पापाराझींसमोर आली आहे. तिच्या साधेपणाने सर्वांचंच मन जिंकलं आहे. मात्र आता या व्हिडिओवरुन तिच्यावर प्रचंड टीका होत आहे. शाळेचा ड्रेस, केसांना पांढऱ्या रंगाचं हेअरबँड आणि लिपस्टिक असा तिचा लुक आहे. तर तिच्या हातात गिटारही आहे. आराध्या हसताना आणि काहीशी लाजताना दिसतेय. मात्र हा व्हिडिओ पाहून शाळेत लिपस्टिक कोण लावतं असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे.

याआधीही आराध्या आणि ऐश्वर्याला त्यांच्या लुकवरुन ट्रोल केले गेले होते. ऐश्वर्याची कित्येक वर्षांपासून एकच हेअरस्टाईल आहे तर आराध्यालाही तिने लहानपणापासून एकाच हेअरस्टाईलमध्ये ठेवलं आहे. यावरुन ऐश्वर्या सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल होत असते. दरम्यान बच्चन परिवाराने मात्र यासंदर्भात मौन बाळगणंच पसंत केलं आहे.

टॅग्स :ऐश्वर्या राय बच्चनअभिषेक बच्चनअमिताभ बच्चनबॉलिवूडसोशल मीडियाट्रोल