Join us

अकायच्या जन्मानंतर अनुष्का शर्माने शेअर केली पहिली पोस्ट, लवकरच भारतात येणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2024 15:27 IST

अनेक दिवसांपासून सोशल मीडियावरुनही गायब असलेल्या अनुष्काने नुकतीच एक पोस्ट शेअर केली आहे.

बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) अनेक महिन्यांपासून लंडनमध्ये आहे. फेब्रुवारीत अकायच्या (Akaay) जन्माआधीच विराट अनुष्का लंडनला रवाना झाले होते. सध्या आयपीएलसाठी फक्त विराट भारतात परतला आहे तर अनुष्का वामिका आणि अकाय दोन्ही मुलांसह लंडनमध्येच आहे. चाहते तिच्या परतण्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. दरम्यान अनेक दिवसांपासून सोशल मीडियावरुनही गायब असलेल्या अनुष्काने नुकतीच एक पोस्ट शेअर केली आहे.

१५ फेब्रुवारी रोजी अनुष्काने 'अकाय'ला जन्म दिला. तोवर अनुष्का कुठेच दिसली नाही. सोशल मीडियावरही तिने कोणतीच पोस्ट केली नव्हती.  अकाय जन्माची गुडन्यूज फक्त तिने सोशल मीडियावरुन शेअर केली. आता यानंतर तिने पहिल्यांदाच इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर केली आहे. सध्या भारतात सर्वजण उत्साहात होळी सण साजरा करत असतानाच दूर लंडनमध्ये असलेल्या अनुष्काने सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना होळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तिने 'हॅपी होली' अशा शुभेच्छा देतानाचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. 

'अकाय'चा जन्म लंडनमध्येच झाला असला तरी त्याला तेथील नागरिकत्व मिळाले असं होत नाही. अनुष्का दोन्ही मुलांसह कधी भारतात परत येते याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. कोहली कुटुंब युकेमध्येच स्थायिक होणार असल्याचीही चर्चा मध्यंतरी सुरु झाली होती. विराटनेही अनुष्का भारतात कधी येणार याबद्दल अद्याप काहीच माहिती दिलेली नाही. अनुष्काचा 'चकदा एक्सप्रेस' हा सिनेमा अद्याप प्रदर्शित झालेला नाही. माजी महिला क्रिकेटपटू झुलन गोस्वामीच्या आयुष्यावर हा सिनेमा आधारित आहे. अनुष्काने झुलन गोस्वामीची भूमिका साकारली आहे.

टॅग्स :अनुष्का शर्माबॉलिवूडसोशल मीडिया