Join us

बाळासाहेब ठाकरेंचा नातू नव्हे तर 'हा' अभिनेता होता' निशांची'साठी पहिली पसंत; अनुराग कश्यपचा खुलासा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2025 14:50 IST

बहुचर्चित 'निशांची'सिनेमासाठी ऐश्वर्य ठाकरे आधी 'या' अभिनेता झालेली विचारणा,नेमकं कुठे बिनसलं?

Anurag Kashyap: बॉलिवूडमधील प्रयोगशील दिग्दर्शक म्हणून अनुराग कश्यप यांच्याकडे पाहिलं जातं.'ब्लॅक फ्रायडे','देव डी','गँग्स ऑफ वासेपूर' यांसारख्या  सुपरहिट चित्रपटांचं दिग्दर्शन त्यांनी केलं आहे. याशिवाय आपल्या चित्रपटांच्या माध्यमातून ते विविध सामाजिक मुद्यांवर देखील भाष्य करत असतात.लवकच त्यांनी दिग्दर्शित केलेला 'निशांची' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये दिवंगत बाळासाहेब ठाकरेंचा नातू ऐश्वर्य मुख्य भूमिकेत झळकणार आहे. अलिकडेच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला. त्यानंतर निशांचीची जोरदार चर्चा सुरु आहे.परंतु तु्म्हाला माहिती आहे का ऐश्वर्य ठाकरेपूर्वी या चित्रपटाची ऑफर बॉलिवूडच्या एका अभिनेत्यासा देण्यात आली होती. स्वत अनुराग कश्यप यांनी याबद्दल खुलासा केला आहे. 

अलिकडेच माध्यमांसोबत बोलताना अनुराग कश्यप यांनी निशांची'साठी पहिली पसंती दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत होता, असं सांगितलं. मात्र, काही कारणास्तव हा प्रोजेक्ट बनला नाही. तेव्हा ते म्हणाले, "त्यावेळी मला सुशांत सिंग राजपूतसोबत 'निशांची' बनवायचा होता. काही कारणास्तव त्याने हा चित्रपट केला नाही.सुरुवातीला त्याने चित्रपटाला होकार दिला आणि नंतर गायब झाला. त्यानंतर त्याच्याकडून काहीच रिप्लाय आला नाही.मी बराच वेळ या चित्रपटासाठी मुख्य नायकाचा शोधात होतो. मग एके दिवशी मी ऐश्वर्यचा ऑनलाइन एक व्हिडिओ पाहिला, ज्यामध्ये त्याने वेगवेगळ्या पात्रांचे एकपात्री प्रयोग केले होते.तो व्हिडीओ पाहिल्यानंतर  निशांची साठी ऐश्वर्यला कास्ट करायचं असं ठरवलं."असा खुलासा त्यांनी केला.

दरम्यान, अनुराग कश्यप यांचा निशांची चित्रपट येत्या १९ ऑगस्टला रिलीज होणार आहे. या चित्रपटात ऐश्वर्य ठाकरे आणि वेदिका पिंटो यांची फ्रेश जोडी पाहायला मिळणार आहे. 

टॅग्स :अनुराग कश्यपबॉलिवूडसिनेमा