Join us
Daily Top 2Weekly Top 5

दम हैं..! 'छोटा भीम'मधील गाणं पाहून भारावून गेले अनुपम खेर; म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2024 17:12 IST

Anupam Kher: 'छोटा भीम' या सिनेमात अनुपम खेर महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आहेत.

चिमुकल्यांच्या दुनियेत छोटा भीम हे कार्टून तुफान गाजलं आहे. आज प्रत्येक घरात लहान मुलं आवडीने छोटा भीम हे कार्टून पाहतात. त्यामुळेच लोकप्रिय ठरलेलं हे कार्टुन रुपेरी पडद्यावर लवकरच उलगडलं जाणार आहे.  अनुपम खेर यांची महत्त्वपूर्ण भूमिका असलेल्या 'छोटा भीम आणि द कर्स ऑफ दम्यान' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यापूर्वी या सिनेमाचा दमदार टीझर रिलीज झाला होता. त्यानंतर आता या सिनेमातील नवं कोरं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या गाण्याचा व्हिडीओ अनुपम खेर यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे.

अनुपम खेर यांचा सोशल मीडियावर दांडगा वावर आहे. त्यामुळे ते कायम त्यांच्या प्रोफेशनल लाइफविषयीचे अपडेट चाहत्यांसोबत शेअर करत असतात. यात नुकतंच त्यांच्या आगामी 'छोटा भीम आणि द कर्स ऑफ दम्यान'  या सिनेमातील 'दम हैं' हे गाणं रिलीज झालं आहे. या गाण्याचा व्हिडीओ पोस्ट करत अनुपम खेर यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

"छोटा भीम सिनेमातील गाण्याचे अपडेट:  या सिनेमातील माझ्या आवडीचं गाणं. आमचा छोटा भीम तुम्हाला सुद्धा अशीच धाडसी प्रेरणा देईल अशी आशा आहे. दम हैं नुकतंच रिलीज झालं आहे, "  असं कॅप्शन देत त्यांनी या गाण्याचा व्हिडीओ शेअर केला आहे.

दरम्यान, 'छोटा भीम आणि द कर्स ऑफ दम्यान' या सिनेमाचं दिग्दर्शन राजीव चिलाका यांनी केलं. तर, निर्मिती राजीव आणि मेघा चिलाका यांनी केलं आहे. या सिनेमात अनुपम खेर महत्त्वपूर्ण भूमिका साकारत असून हा सिनेमा 24 मे 2024 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

टॅग्स :बॉलिवूडसिनेमाअनुपम खेर