Join us
Daily Top 2Weekly Top 5

'नॅशनल क्रश' तृप्ती डिमरीने कथित बॉयफ्रेंडला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, रोमँटिक फोटोने वेधलं लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2024 13:39 IST

तृप्ती डिमरीच्या बॉयफ्रेंडला पाहिलंत का?

अभिनेत्री तृप्ती डिमरी (Tripti Dimri) हे नाव आता सर्वांच्याच परिचयाचं झालं आहे. मागच्या महिन्यात रिलीज झालेल्या Animal सिनेमानंतर तिची नॅशनल क्रश म्हणून ओळख झाली. सिनेमातील तृप्ती आणि रणबीर कपूरच्या इंटिमेट सीनचीही चर्चा झाली. सर्वांनाच तृप्तीबद्दल जाणून घ्यायची उत्सुकता होती. नुकतंच तृप्तीने तिचा कथित बॉयफ्रेंड सॅम मर्चंटला (Sam Merchant) वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तिची पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

'नॅशनल क्रश' म्हणून लोकप्रिय झाल्यानंतर तृप्ती डिमरी सतत चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी ती तिच्या मित्राच्या लग्नात सहभागी झाली होती. या लग्नातील तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. लग्नातील तिच्या हॉट लूकच्या चाहते प्रेमातच पडले. दरम्यान तिचा एका 'मिस्ट्री मॅन'सोबतचा फोटोही तुफान व्हायरल झाला. सॅम मर्चंट असं त्याचं नाव असून तो तृप्तीचा बॉयफ्रेंड असल्याचीच चर्चा सुरु झाली. मात्र तृप्तीने यावर अजूनपर्यंत प्रतिक्रिया दिलेली नाही. आज सॅम मर्चंटचा वाढदिवस असल्याने तृ्प्तीने खास मेसेज लिहित त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. तिने 2017 आणि 2023 सालचा फोटो शेअर केला आहे. पहिल्या फोटोत ती ब्लॅक ड्रेसमध्ये खूप सुंदर दिसत आहे. तर ब्लॅक शर्ट घातला आहे. त्याने तिला मागून मिठीत घेतले आहे तर तृप्ती डोळे बंद करुन दिलखुलास हसताना दिसत आहे. तर दुसऱ्या फोटोत दोघंही गाडीवर असून त्यांनी हेल्मेट घातले आहे. तृप्तीने हा सेल्फी घेतला आहे जो 2023 सालचा आहे. 'हॅपी बर्थडे सॅम, रामश्यामची पाणीपुरी खाऊनही आपण आधीसारखेच बारीक राहिलो असतो तर किती बरं झालं असतं.' असं मजेशीर कॅप्शन तिने फोटोंसोबत  लिहिलं आहे.   

तृप्ती आणि सॅमची मैत्री अगदी जुनी असल्याचं या फोटोंमधून स्पष्ट होतंय. दोघंही एकमेकांचे खास मित्र आहेत. Animal हा तृप्तीचा पहिला सिनेमा नाही. याआधीही तिने 'लैला मजनू','कला','बुलबुल' या सिनेमांमध्ये काम केले आहे. अनुष्का शर्माचा भाऊ कर्णेश शर्मासोबत ती बराच काळ रिलेशनशिपमध्येही होती. मात्र नंतर दोघांचं नातं तुटलं. सध्या तृप्ती सॅमसोबत असल्याच्या चर्चा आहेत.

टॅग्स :तृप्ती डिमरीसोशल मीडियाबॉलिवूड