Join us
Daily Top 2Weekly Top 5

अनिल कपूरने सांगितला 'वेलकम'मधील 'त्या' पेंटिंगचा अर्थ; ऐकून अक्षय कुमारही चक्रावला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2026 18:40 IST

२००७ मध्ये आलेला सुपरहिट कॉमेडी 'वेलकम' या चित्रपटाचा चाहता वर्ग खूप मोठा आहे.

२००७ मध्ये आलेला सुपरहिट कॉमेडी 'वेलकम' या चित्रपटाचा चाहता वर्ग खूप मोठा आहे. RDX पासून मजनू भाई आणि उदय शेट्टी पर्यंतची व्यक्तिरेखा आजही लोकांच्या मनात घर करून आहेत. या चित्रपटातील 'मजनू भाई' या पात्रानं काढलेलं ते पेंटिंग आजही प्रेक्षकांच्या चांगलंच लक्षात आहे. यावर गेल्या २० वर्षांपासून सोशल मीडियावर असंख्य मीम्स बनले. मात्र, आता स्वतः अनिल कपूरनं या पेंटिंगमागचा एक अतिशय गंभीर आणि विचार करायला लावणारा अर्थ सांगितला आहे. जो ऐकून खिलाडी अक्षय कुमारलाही आश्चर्याचा धक्का बसला.

अक्षय कुमारच्या 'द व्हील ऑफ फॉर्च्यून' या शोमध्ये नुकतंच अनिल कपूरनं हजेरी लावली. यावेळी मजनू भाईंच्या पेंटिंगचा विषय निघाल्यावर अनिल कपूर म्हणाला, "ते पेंटिंग म्हणजे केवळ एक विनोद नव्हता. त्यामागे एक खोल विचार होता. पेंटिंगमधील घोडा हा कठोर परिश्रम आणि वेगाचे प्रतीक आहे, तर गाढव हे संथपणाचे प्रतीक आहे. अनेकदा वास्तविक जीवनात विशेषतः कॉर्पोरेट जगात असं घडतं की, घोडा प्रचंड मेहनत करतो, पण त्याचं श्रेय मात्र गाढवाला मिळतं. हे बॉस आणि कर्मचारी यांच्यातील गुंतागुंतीच्या नात्यावर भाष्य करणारं पेंटिंग होतं", असं अनिल कपूरनं सांगितलं. 

यावेळी अनिल कपूरनं आणखी एक धक्कादायक खुलासा केला. तो म्हणाला की, या पेंटिंगचे फोटो असलेले टी-शर्ट्स जे बाजारात विकले जातात, त्यावरून त्यांना आजही रॉयल्टी मिळते. हे ऐकून अक्षय कुमार थक्क झाला आणि त्याने अनिल कपूरच्या बिझनेस माइंडचं कौतुक केलं.

आगामी प्रोजेक्टअनिल कपूर सध्या 'सुभेदार' या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहेत. हा चित्रपट ५ मार्च रोजी अमेझॉन प्राइम व्हिडीओवर प्रदर्शित होत आहे. सुरेश त्रिवेणी दिग्दर्शित या ॲक्शन चित्रपटात अनिल कपूरसोबत मोना सिंग, राधिका मदन आणि सौरभ शुक्ला यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. याशिवाय, अनिल कपूर  'अल्फा' आणि शाहरुख खानच्या 'किंग' या चित्रपटांमध्येही झळकणार आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Anil Kapoor reveals the hidden meaning of 'Welcome' painting.

Web Summary : Anil Kapoor revealed the deep meaning behind Majnu Bhai's painting in 'Welcome,' surprising Akshay Kumar. He explained the horse represents hard work, while the donkey symbolizes slow progress, reflecting corporate dynamics. Kapoor also disclosed receiving royalties from T-shirts featuring the painting.
टॅग्स :अनिल कपूरबॉलिवूडअक्षय कुमार