बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री सोनम कपूर दुसऱ्यांदा आई झाली आहे. सोनम आणि तिचा पती आनंद अहुजा यांनी सोशल मीडियावर पोस्ट करुन ही गुड न्यूज सर्वांसोबत शेअर केली. सोनम आणि आनंदला मुलगा झाला आहे. ही गुड न्यूज शेअर करताना सोनमने सर्वांचे आभार मानले. सोनम ही प्रसिद्ध अभिनेते अनिल कपूर यांची मुलगी. अनिल कपूर यांनी लेक दुसऱ्यांदा आई झाल्यावर सोशल मीडियावर पोस्ट करुन आनंद व्यक्त केला आहे. काय म्हणाले अनिल?
अनिल कपूर यांनी सोशल मीडियावर पोस्ट करुन भावना व्यक्त करताना लिहिलं की, "आणि बघता बघता... माझं हृदय प्रेमाने अजूनच भरून आलंय. माझ्या बाळा, या जगात तुझं स्वागत आहे, तुझ्यावर आत्तापासूनच आम्हा सर्वांचं खूप प्रेम आहे. वायू, तू आता मोठा भाऊ झाला आहेस... आणि मला खात्री आहे की तू तुझी जबाबदारी उत्तम निभावशील. सोनम आणि आनंद, तुमचे खूप खूप आभार... नानाचं हृदय आज आनंदाने भरून गेलंय. बाळा, या गोंधळलेल्या पण सुंदर जगात तुझं स्वागत आहे. प्रेमाने भरलेल्या आयुष्यासाठी तुझं स्वागत."
Web Summary : Sonam Kapoor and Anand Ahuja welcomed their second child. Overjoyed, grandfather Anil Kapoor expressed his happiness, welcoming the baby to the world and praising Vayu for becoming a big brother.
Web Summary : सोनम कपूर और आनंद आहूजा ने अपने दूसरे बच्चे का स्वागत किया। दादा अनिल कपूर ने खुशी व्यक्त करते हुए बच्चे का दुनिया में स्वागत किया और वायु को बड़ा भाई बनने के लिए सराहा।