गेल्या काही काळापासून बॉलिवूड कलाकारांचा ओघ मराठी सिनेसृष्टीकडे वळल्याचं दिसून येत आहे. आतापर्यंत अनेक बॉलिवूड स्टार्सने मराठी सिनेमांमध्ये काम केलं आहे. मात्र, बॉलिवूडचा ओघ जरी आताच सुरु झाला असला तरीदेखील मराठी कलाकार फार वर्षांपासून बॉलिवूडमध्ये सक्रीय आहेत. त्यामुळे अनेकदा हिंदी सिनेसृष्टीतही मराठी कलाकारांविषयी भाष्य केलं जातं. अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे, सचिन पिळगांवकर यांसारख्या मराठी कलाकारांनी बॉलिवूडमध्ये अनेक भूमिका गाजवल्या आहेत.
बॉलिवूडमध्ये मराठी कलाकारांचं एक विशेष स्थान आहे. त्यामुळे अनेकदा बॉलिवूड स्टार मराठी कलाकारांविषयी भाष्य करतात. यामध्येच बॉलिवूडचा फिटमॅन अर्थात अनिल कपूर यांनी मराठी कलाकारांविषयी त्यांचं मत मांडलं. इतकंच नाही तर त्यांना कोणता मराठी कलाकार आवडतो हे सुद्धा सांगितलं. अनिल कपूर यांनी 'लोकमत फिल्मी'शी केलेल्या खास बातचीतमध्ये त्यांचा आवडता मराठी सिनेमा आणि कलाकार कोणता हे सांगितला.
अनिल कपूर यांना आवडतो हा मराठी कलाकार
या मुलाखतीमध्ये बोलत असतांना त्यांनी दिवगंत अभिनेता लक्ष्मीकांत बेर्डे यांची एक आठवण सांगितली. अनिल कपूर यांना आवडता मराठी सिनेमाबद्दल विचारलं तेव्हा त्यांनी 'हमाल दे धमाल' सिनेमाचं नाव घेतलं. याविषयी बोलताना अनिल कपूर म्हणाले, "आवडत्या सिनेमाबद्दल सांगायचं तर हमाल दे धमाल सिनेमाचं मी नाव घेईल. या सिनेमात मी लक्ष्मीकांत बेर्डेंसोबत काम केलेलं. मी त्यात काम केलं म्हणून तो माझा फेव्हरेट सिनेमा आहे, असं नाही. तर, लक्ष्मीकांत बेर्डेजी खूप मस्त माणूस होते. त्यांनी मला एकदा फोन केलेला, लक्ष्मीकांत यांची इच्छा होती की, हमाल दे धमाल मध्ये मी पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारावी. आणि, हे ऐकून मी लगेच होकार कळवला."
अनिल कपूर पुढे म्हणतात, "लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यासोबत आधी मी बेटा सिनेमात काम केलेलं. हमाल दे धमाल पिक्चर सुपरहिट झाला. सिल्व्हर ज्युबिलीचं भाग्य सिनेमाला मिळालं. मी जेव्हा सिनेमा बघितला तेव्हा मलाही खूप मजा आली." अशाप्रकारे अनिल कपूर यांनी लक्ष्याची आठवण जागवली.
Web Summary : Anil Kapoor admires late Laxmikant Berde. He fondly recalls working with Berde in 'Humal De Dhamal', a film he enjoyed immensely. Kapoor cherishes Berde's talent and their collaboration.
Web Summary : अनिल कपूर दिवंगत लक्ष्मीकांत बेर्डे की प्रशंसा करते हैं। उन्हें 'हमाल दे धमाल' में बेर्डे के साथ काम करना याद है, जो उन्हें बहुत पसंद आई थी। कपूर बेर्डे की प्रतिभा और उनके सहयोग को संजोते हैं।