Join us

पांढरी साडी, हातात फाईल; 'केसरी चॅप्टर २'मधून अनन्या पांडेचा लूक व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2025 15:02 IST

अनन्याचा पांडेचा लूक पाहून नेटकऱ्यांनी तिच्या भूमिकेबद्दल विविध अंदाज बांधले आहेत.

अक्षय कुमारचा (Akshay Kumar) बहुप्रतिक्षित 'केसरी २' (Kesari 2) पुढील महिन्यात प्रदर्शित होत आहे. जालियनवाला बाग गोळीबार या ऐतिहासिक प्रकरणावर सिनेमा आधारित आहे. नुकताच याचा टीझर आला आहे. सिनेमात अक्षय कुमार वकिलाच्या भूमिकेत दिसत आहे. तर आर माधवन आणि अभिनेत्री अनन्या पांडेचीही यामध्ये भूमिका आहे. दरम्यान सिनेमातील अनन्याचा पांडेचा लूक व्हायरल झाला आहे. तिचा लूक पाहून नेटकरी प्रभावित झालेत.

रेडिट पोस्टवर 'केसरी चॅप्टर २'चं एक पोस्टर व्हायरल होत आहे. अक्षय कुमार आणि आर माधवनचा क्रॉस फोटो आहे. तर मध्ये अनन्या पांडे दिस आहे. पांढरी ब्रिटिश स्टाईल साडी, त्या काळातली हेअरस्टाईल, हातात फाईल असा तिचा  लूक आहे. अनन्या पांडे ब्रिटिश भूमिकेत आहे का? अशीही चर्चा सुरु आहे. अद्याप अनन्याच्या भूमिकेबद्दल आणि लूकबद्दल अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

अक्षय कुमार सिनेमा वकील आहे त्यामुळे अनन्या पांडे कदाचित प्रॉसिक्युशन वकील असू शकते असा अंदाज नेटकरी लावत आहेत. निर्मात्यांनी मात्र अद्याप तिच्या भूमिकेबद्दल गुप्तता पाळली आहे. त्यामुळे अनन्याचा सिनेमातील अभिनय कसा असेल याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

'केसरी चॅप्टर २' पुढील महिन्यात १८ एप्रिल रोजी प्रदर्शित होत आहे. भारतीय स्वातंत्र्यसेनानी बॅरिस्टर सी. शंकरन यांच्या आयुष्यावर सिनेमा आधारित आहे. अक्षय कुमार त्यांचीच भूमिका साकारत आहे. करण जोहरच्या धर्मा प्रोडक्शनखाली सिनेमाची निर्मिती झाली आहे. 

टॅग्स :अनन्या पांडेकेसरीअक्षय कुमारआर.माधवनबॉलिवूड