Join us
Daily Top 2Weekly Top 5

अंबानींच्या कार्यक्रमात रिहानाची झाली फजिती; लाइव्ह शो सुरु असताना स्टेजवर फाटला ड्रेस

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2024 07:39 IST

Rihanna: अंबानी कुटुंबाची शोभा वाढवण्याच्या नादात रिहानाने स्वत:ची मात्र फजिती करुन घेतली.

देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असा नावलौकिक असणाऱ्या अंबानी (ambani)कुटुंबात सध्या अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नाची धामधूम पाहायला मिळत आहे. नुकतंच जामनगरमध्ये (गुजरात) या जोडीचं प्री वेडिंग फंक्शनला पार पडलं. या कार्यक्रमात देशविदेशातील अनेक दिग्गज व्यक्ती हजेरी लावत होती. यात हॉलिवूडची पॉप स्टार रिहाना (rihanna) हिने देखील परफॉर्मन्स करत या कार्यक्रमाची शोभा वाढवली. मात्र, अंबानी कुटुंबाची शोभा वाढवण्याच्या नादात रिहानाने स्वत:ची मात्र फजिती करुन घेतली.

अनंत-राधिकाच्या (anant and radhika) प्री वेडिंग सोहळ्यात शुक्रवारी रिहानाने लाइव्ह परफॉर्मन्स दिला. मात्र, हा परफॉर्मन्स सुरु असतानाच तिचा ड्रेस फाटला. ज्यामुळे तिची ऐन कार्यक्रमात फजिती झाली. इतकंच नाही तर सोशल मीडियावर तिचा हा फोटो वाऱ्यासारखा व्हायरल झाला असून नेटकऱ्यांनी तिची खिल्ली उडवली आहे.

रिहाना परफॉर्मन्स दरम्यान नीता अंबानी यांच्यासोबत फोटोसाठी पोझ देत होती. यावेळी तिचा ड्रेस हाताजवळ फाटल्याचं कॅमेरात कैद झालं. ज्यानंतर नेटकऱ्यांनी तिची खिल्ली उडवायला सुरुवात केली. रिहानाने या अनंत-राधिकाच्या प्री-वेडिंग फंक्शनसाठी हिरव्या रंगाचा बॉडीकॉन शिमरी गाऊन परिधान केला होता. त्यावर तिने हेवी ज्युलरी आणि गुलाबी रंगाचा दुपट्टा कॅरी केला होता.

एका परफॉर्मन्ससाठी रिहानाने घेतले अंबानींकडून कोट्यवधी रुपये

मीडिया रिपोर्टनुसार, रिहानाने अनंत-राधिकाच्या प्री-वेडिंग कार्यक्रमात लाइव्ह परफॉर्मन्स करण्यासाठी ६६ ते ७४ कोटी रुपये मानधन घेतल्याचं सांगण्यात येतं.

दरम्यान,  ३ मार्च पर्यंत राधिका-अनंत यांचं प्री-वेडिंग फंक्शन होणार होतं. त्यामुळे नुकतंच हे फंक्शन संपलं असून लवकरच ही जोडी लग्नगाठ बांधणार आहे. आतापर्यंत झालेल्या या प्री-वेडिंग फंक्शनसाठी राजकीय व्यक्तिमत्त्वांपासून देशविदेशातील दिग्गजांनी हजेरी लावली होती. यात बॉलिवूड कलाकारांचाही सहभाग होता.

टॅग्स :रिहानाअनंत अंबानीसेलिब्रिटीहॉलिवूड