Join us
Daily Top 2Weekly Top 5

जुही चावलाच्या प्रेग्नंसीमुळे बिग बींची झालेली अडचण; एकाच वेळी करावं लागलं दोन सिनेमांचं शुटिंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2023 15:21 IST

Amitabh bachchan: सिनेमाचं शूट करताना जुही चावलाची गैरसोय होऊ नये यासाठी बिग बींनी स्वत:च्या शुटिंगच्या वेळा बदलल्या होत्या.

बॉलिवूड सुपरस्टार अमिताभ बच्चन यांनी वयाची 80 वर्ष पार केली आहेत. मात्र, आजही इंडस्ट्रीमध्ये त्यांचा सक्रीय सहभाग असल्याचं पाहायला मिळतो. आजवरच्या कारकिर्दीत त्यांनी अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये काम केलं. त्यामुळे प्रत्येक सिनेमाशी निगडीत त्यांचे अनेक किस्से आहेत. यामध्येच सध्या त्यांच्या एक रिश्ताः द बॉन्ड ऑफ लव या सिनेमातील किस्सा चर्चिला जात आहे. या सिनेमासाठी बिग बींनी चक्क डबल शिफ्टमध्ये काम केलं होतं. विशेष म्हणजे एका लोकप्रिय अभिनेत्रीसाठी त्यांनी डबल शिफ्टमध्ये काम केलं.

"एक रिश्ताः द बॉन्ड ऑफ लव  या सिनेमाचे दिग्दर्शक सुनील दर्शन यांनी या सिनेमाचा एक किस्सा शेअर केला. यात जुही चावलासाठी अमिताभ बच्चन यांनी डबल शिफ्टमध्ये काम केलं होतं. या सिनेमामध्ये अमिताभ यांच्यासोबत अक्षय कुमार, राखी, करिश्मा कपूर आणि जुही चावला या कलाकारांनी स्क्रीन शेअर केली होती. परंतु, या सिनेमाचं शुटिंग करण्यापूर्वीच आम्हाला समजलं की जुही चावला प्रेग्नंट आहे. या सिनेमात तिची महत्त्वपूर्ण भूमिका होती. ती अमिताभ यांच्या मुलीची आणि अक्षय कुमारच्या मोठ्या बहिणीची भूमिका साकारत होती. पण, ती प्रेग्नंट असल्यामुळे शूटिंगच्या शेड्युल डेट्समध्ये बदल करावा लागणार होता. दुसरीकडे अमिताभ बच्चन यांनी कभी खुशी कभी गम या सिनेमासाठी ऑलरेडी तारखा दिल्या होत्या. यामध्येच एक रिश्ताः द बॉन्ड ऑफ लवच्या शुटिंगच्या तारखा आणि कभी खुशी कभी गमच्या तारखा सारख्याच होत्या. परंतु, तू शुटिंग सुरु कर असं बिग बींनी मला सांगितलं", असं सुनील दर्शन यांनी सांगितलं.

पुढे ते म्हणतात, "अमिताभ यांनी या दोन्ही सिनेमासाठी चक्क दोन शिफ्टमध्ये काम केलं. सकाळी ९ ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत ते करण जोहरसोबत काम करत होते. त्यानंतर संध्याकाळी ७ ते रात्री २ पर्यंत ते आमच्या सिनेमासाठी काम करायचे." दरम्यान, कामाप्रती प्रेम, निष्ठा असलेल्या अमिताभ बच्चन यांचे हे दोन्ही सिनेमा बॉक्स ऑफिसवर चांगलेच गाजले. त्यामुळे आजही लोकप्रिय सिनेमांच्या यादीत या दोघांची नाव घेतली जातात.

टॅग्स :अमिताभ बच्चनजुही चावला बॉलिवूडकरण जोहर