Join us

गाण्याचं श्रेय अभिषेकसोबत स्वत:लाच दिलं, ऐश्वर्याचा उल्लेखही नाही; बिग बींवर भडकले नेटकरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2024 14:13 IST

अमिताभ बच्चन यांनी गाण्याबद्दल ट्विट केलंय. पण यात ऐश्वर्याचा उल्लेखच न केल्याने नेटकरी भडकले आहेत. 

2005 साली आलेला 'बंटी और बबली' सिनेमा सुपरहिट  झाला होता. अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) आणि राणी मुखर्जी यांची सिनेमात मुख्य भूमिका होती. तसंच सिनेमातलं 'कजरा रे' हे गाणंही विशेष गाजलं. आजही काही पार्ट्यांमध्ये हे गाणं हमखास वाजतं. अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) आणि ऐश्वर्या राय (Aishwarya Rai) यांनी खास या गाण्यात डान्स केला होता. शिवाय अभिषेक बच्चनही होताच. इतक्या वर्षांनी अमिताभ बच्चन यांनी गाण्याबद्दल ट्विट केलंय. पण यात ऐश्वर्याचा उल्लेखच न केल्याने नेटकरी भडकले आहेत. 

नक्की काय आहे ट्वीट?

अभिषेक बच्चनच्या एका फॅन क्लब अकाऊंटवरुन 'कजरा रे' गाण्याचा फोटो शेअर करण्यात आला. "बंटी और बबली'ला 19 वर्ष झाल्यानिमित्ताने ही पोस्ट होती. अमिताभ बच्चन यांनी ही पोस्ट रिट्वीट करत लिहिले, 'हे गाणं केवढं लोकप्रिय झालं. आजही लोक हे गाणं एन्जॉय करतात. भैय्यू(अभिषेक बच्चन)सोबत हे गाणं स्टेजवर लाईव्ह परफॉर्म करताना खूप धमाल आली."

अमिताभ बच्चन यांच्या याच ट्वीटवर नेटकरी भडकले आहेत. या गाण्यात ऐश्वर्याही होती आणि तिने कमाल डान्स केला होता. पण त्यांनी ऐश्वर्याचा उल्लेखही केला नाही. एका युझरने लिहिले, 'माफ करा पण कजरा रे गाणं ऐश्वर्याचंच होतं. तुम्ही दोघं तर फक्त सहाय्यक डान्सर होतात.'

बच्चन कुटुंबात सध्या सर्वकाही आलबेल नाही अशी चर्चा आहे. ऐश्वर्याचं सासू आणि नणंदबरोबर पटत नसून अगदी अभिषेकसोबत घटस्फोट घेणार असल्याचीही चर्चा झाली. अद्याप बच्चन कुटुंबियांकडून यावर अधिकृत काहीही आलेलं नाही.

टॅग्स :अमिताभ बच्चनट्रोलट्विटरसोशल मीडियाअभिषेक बच्चनऐश्वर्या राय बच्चन