Join us

आणखी एका पॉर्न स्टारचं बॉलिवूडमध्ये पदार्पण; सनी लिओनीला देतीये टक्कर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2022 07:00 IST

Mia Malkova: राम गोपाल वर्मा यांच्या 'क्लायमॅक्स' या चित्रपटात तिने यापूर्वी काम केलं आहे.

पॉर्न इंडस्ट्रीला रामराम करत बॉलिवूडमध्ये आपला जम बसवणारी अभिनेत्री म्हणजे सनी लिओनी (sunny leone). एकेकाळी बोल्डनेसमुळे चर्चेत येणारी सनी आज तिच्या अभिनयामुळे चर्चेत येते. त्यामुळे कलाविश्वात ती अल्पावधीत लोकप्रिय झाली आहे. मात्र, आता तिला टक्कर देण्यासाठी पॉर्न इंडस्ट्रीमधील आणखी एक अभिनेत्री बॉलिवूड पदार्पणाच्या मार्गावर असल्याचं सांगण्यात येतं. 

सध्या सोशल मीडियावर अभिनेत्री मिया माल्कोवा (Mia Malkova) हिची चर्चा रंगली आहे. मियाने राम गोपाल वर्मा यांच्या 'क्लायमॅक्स' या चित्रपटात काम केलं असून लवकरच ती अन्य बॉलिवूड प्रोजेक्टमध्ये झळकण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे मियाने राम गोपाल वर्मा यांच्या चित्रपटासह काही बॉलिवूड चित्रपटांमध्ये आयटम साँगही केले आहेत. त्यामुळे मिया हळूहळू बॉलिवूडमध्ये जम बसवायच्या तयारीत असल्याचं दिसून येत आहे.

दरम्यान, मिया माल्कोवा  ही प्रसिद्ध अमेरिकन पॉर्नस्टार असून तिचं बॉलिवूड पदार्पण म्हणजे सनी लिओनीला टक्कर असल्याचं म्हटलं जात आहे. क्लायमॅक्ससह तिने 'गॉड, सेक्स अँड ट्रुथ'मध्येही काम केलं आहे. सोशल मीडियावर सक्रीय असलेल्या मियाचा जन्म १९९२ मध्ये कॅलिफॉर्नियामध्ये झाला. तसंच ती मूळची फ्रेंच कॅनेडियन असल्याचं म्हटलं जातं. 

टॅग्स :सनी लिओनीसनी देओलबॉलिवूडसेलिब्रिटीसिनेमा