Join us

'गदर' फेम अमिषा पटेल पाकिस्तानी अभिनेत्यासोबत थाटणार संसार ? इम्रान अब्बास नेमका कोण ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2025 15:14 IST

अमिषा ही पाकिस्तानी अभिनेत्याच्या प्रेमात असल्याची चर्चा रंगली आहे. 

Ameesha Patel on  Imran Abbas: बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्रींच्या यादीत अमिषा पटेल (Amisha Patel)चा समावेश होतो. अभिनेत्रीने २००० साली 'कहो ना प्यार है' मधून आपल्या सिने करिअरला सुरुवात केली. या चित्रपटातून अमिषा रातोरात स्टार बनली. आजही आमिषाचा मोठा चाहतावर्ग आहे. अमिषा पटेल तिच्या प्रोफेशनल लाइफपेक्षा जास्त पर्सनल लाइफमुळे चर्चेत येत असते. आताही तिनं सर्वांचं लक्ष वेधलं आहे. अमिषा ही पाकिस्तानी अभिनेत्याच्या प्रेमात असल्याची चर्चा रंगली आहे. 

आमिषा ही ४९ वर्षांची झाली आहे, पण तिचे अजून लग्न झालेले नाही. गेल्या काही दिवसांपासून अमिषाचं पाकिस्तानी अभिनेता इम्राम अब्बाससोबत नाव जोडले जात आहे. दोघे एकमेंकाना डेट करत असल्याच्या चर्चा रंगल्यात. या अफवांवर तिने आता स्पष्टीकरण दिले आहे. ती म्हणाली, "या अफवा गेल्या दोन ते तीन वर्षांपासून चालू आहेत. पण आमचं लग्न झालं का? आम्ही कार्यक्रमांमध्ये भेटतो, आम्ही चांगले मित्र आहोत. जर भारताबाहेर कोणताही कार्यक्रम असेल तर आम्ही भेटतो.  दुसरे काही नाही. लोकांना फक्त संधी हवी असते. जर दोन चांगले दिसणारे लोक एकत्र दिसले तर अफवा सुरू होतात. तोही अविवाहित आहे, मीही अविवाहित आहे, त्यामुळे आमचे लग्न व्हावे अशी इच्छा लोक व्यक्त करतात आणि मग अफवा पसरतात".

इम्रान अब्बास कोण आहे?१५ ऑक्टोबर १९८२ रोजी पाकिस्तानातील इस्लामाबाद येथे जन्मलेले इमरान अब्बास हा पाकिस्तानी चित्रपट आणि टीव्ही इंडस्ट्रीतील एक लोकप्रिय अभिनेता आहेत. त्याने क्रिएचर ३डी (२०१४) या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. तसेच तो 'ए दिल है मुश्किल' (२०१६) या चित्रपटातही तो दिसला. इम्रान अब्बासने अनेक पाकिस्तानी चित्रपट आणि मालिका केल्या आहेत. ज्या तिथे खूप आवडल्या जातात. इमरानला अमिषा पटेलसोबत अनेकदा पाहिले गेलं आरे. 

आमिषाच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर तिनं 'कहो ना प्यार है'नंतर 'गदर - एक प्रेम कथा', 'हमराज', 'मंगल पांडे: द रायझिंग', 'हनीमून ट्रॅव्हल्स', 'भुल-भुलैया' आणि 'रेस २' सारखे चित्रपट केले. तर २०२३ मध्ये अभिनेत्री 'गदर २' मधून मोठ्या पडद्यावर झळकली. तिने सकीनाची भूमिका साकारून प्रेक्षकांची मने जिंकली. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर मोठी कमाई करून इतिहास रचला. .  ती सोशल मीडियावर खूप सक्रिय असते आणि तिच्या चाहत्यांना अपडेट देत असते. 'गदर २' नंतर अमिषा कोणत्याही प्रोजेक्टमध्ये दिसलेली नाही. आता चाहते त्याच्या आगामी प्रोजेक्ट्सची आतुरतेने वाट पाहत आहेत. 

टॅग्स :अमिषा पटेलपाकिस्तानसेलिब्रिटीबॉलिवूडलग्न