Join us
Daily Top 2Weekly Top 5

एकॉनसोबत 'छम्मक छ्ल्लो' गाण्यावर नाचत होती अंबानींची होणारी सून, 'त्या' कृतीमुळे होतंय कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2024 10:54 IST

अमेरिकन गायक एकॉन शूट करत होता व्हिडिओ, राधिका मर्चंटने केलं असं काही की सोशल मीडिायावर होतंय कौतुक

अंबानी कुटुंबाची होणारी धाकटी सून राधिका मर्चंटने (Radhika Merchant) सध्या सर्वांचंच लक्ष वेधून घेतलंय. तिचं हास्य, सौंदर्य यावर चाहते घायाळ झालेत. नॅशनल क्रश असंही तिला म्हणलं जात आहे. जुलै मध्ये अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट मुंबईत लग्नबंधनात अडकणार आहेत. नुकताच त्यांचा प्री वेडिंग सोहळा जामनगर येथे जल्लोषात पार पडला. जिकडे तिकडे या सोहळ्याचीच चर्चा होती. दरम्यान प्री वेडिंग फंक्शनच्या शेवटच्या दिवसाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. अमेरिकन गायक एकॉन (Akon) आणि राधिका मर्चंट यांचा तो व्हिडिओ आहे.

अंबानींच्या प्री वेडिंग सोहळ्यासाठी शेवटच्या दिवशी दिग्गज गायकांनी हजेरी लावली. श्रेया घोषाल, अरिजीत सिंह, नीति मोहन, सुखविंदर, मोहित चौहान, लकी अली, दलजीत, उदित नारायण या गायकांनी स्टेजवर लाईव्ह परफॉर्म केलं. यानंतर अमेरिकन गायक एकॉनने 'रा वन' सिनेमातील लोकप्रिय 'छम्मक छल्लो' गाण्यावर परफॉर्मन्स दिला. शाहरुखसह सर्वच कलाकार आणि अंबानी कुटुंब या गाण्यावर थिरकले. यावेळी एकॉन सेल्फी व्हिडिओ शूट करत होता. तेव्हा राधिका मर्चंट त्याच्या बाजूला आली आणि तिनेही कॅमेऱ्यात पाहिले. याचवेळी राधिकाला कळलं की तिच्या टॉप रिव्हीलिंग वाटतोय आणि गळा फारच डीप आहे. लगेच तिने जॅकेट घट्ट ओढून हाताची घडी घातली. हा व्हिडिओ काही क्षणात वेगाने व्हायरल झाला.

राधिकाचा हा व्हिडिओ पाहताच नेटकऱ्यांनाही ती गोष्ट लगेच लक्षात आली. सर्वांनीच अंबानींच्या होणाऱ्या सूनेचं कौतुक केलं. 'तुझ्याबद्दलचा आदर आणखी वाढला आहे','हाच फरक असतो रॉयल बिझनेस स्टेटस आणि बॉलिवूड अभिनेत्रींमध्ये' अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत.

प्री वेडिंगमधील राधिका मर्चंटचे अनेक क्युट व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेत. राधिकाने सर्वांच्याच मनात तिचं स्थान निर्माण केलंय. प्रत्येक जण अंबानींच्या होणाऱ्या सूनेचं कौतुकच करताना दिसतोय. 

टॅग्स :अनंत अंबानीमुकेश अंबानीसोशल मीडियाबॉलिवूड