Join us

‘श्रीवल्ली’च्या चाहत्यांसाठी वाईट बातमी, ‘Pushpa 2’च्या मेकर्सनी घेतला इतका मोठा निर्णय!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2022 17:29 IST

Pushpa-The Rule: ‘पुष्पा 2’ची कथा झाली लीक, श्रीवल्लीच्या भूमिकेला लागणार कात्री? यापुढची बातमी आणखी शॉकिंग आहे...

या वर्षाच्या सुरूवातीला रिलीज झालेला आणि बॉक्स ऑफिसवर तुफान गाजलेला ‘पुष्पा - द राइज’ (Pushpa- The Rise) या सिनेमाचा सीक्वल येतोय, हे तुम्हाला ठाऊक आहेच. अल्लू अर्जुन (Allu Arjun) व रश्मिका मंदाना  (Rashmika Mandanna) स्टारर या सिनेमाच्या हिंदी व्हर्जनने 100 कोटींपेक्षा अधिक कमाई केली होती. या चित्रपटातील अल्लू अर्जुनच्या अनोख्या स्टाईलनं सगळ्यांनाच क्रेझी केलं होतं. शिवाय कधी अल्लड, खोडकर तर कधी साधी, सरळ गावातील तरुणी असलेल्या ‘श्रीवल्ली’ अर्थात रश्मिका मंदानानेही प्रेक्षकांना वेड लावलं होतं. तुम्ही या श्रीवल्लीचे फॅन असाल आणि ‘पुष्पा 2’मध्ये (Pusha 2) तिला भेटण्यास आतूर असाल तर तुमच्यासाठी एक वाईट बातमी आहे. होय, रिपोर्टनुसार ‘पुष्पा 2’मध्ये श्रीवल्लीची भूमिकेला कात्री लावण्यात आली आहे. तिचा रोल बराच कमी करण्यात आला आहे.  इतकंच नाही तर यापुढची बातमी आणखी शॉकिंग आहे...

श्रीवल्लीचा होणार मृत्यू...?‘पुष्पा 2’ची कथा लिक झाली आहे. चर्चा खरी मानाल तर ‘पुष्पा 2’मध्ये श्रीवल्लीचा मृत्यू दाखवण्यात येणार आहे. पहिल्या पार्टमध्ये पुष्पाच्या भूमिकेतील अल्लू अर्जून   आणि श्रीवल्लीच्या भूमिकेतीज रश्मिकाला चाहत्यांनी अक्षरश: डोक्यावर घेतलं. दोघांची रोमॅन्टिक केमेस्ट्री प्रत्येकाला भावली. चित्रपटाच्या दुसऱ्या भागातही ही केमिस्ट्री पाहण्यास मिळेल, अशी अपेक्षा प्रेक्षकांना होती. परंतु, रिपोर्टनुसार, श्रीवल्लीच्या पात्राला दुसऱ्या भागात कमी सीन्स देण्यात आले असल्याची चर्चा  आहे. इतकंच नाही तर तिचा मृत्यू दाखवला जाईल. चित्रपटातील विलन (फहाद फासिल) हा श्रीवल्लीची हत्या करतो, असं दाखवलं जाईल आणि पुष्पा याचा बदला घेईल.  

आता या चर्चेत किती तथ्य आहे, हे माहित नाही. पण हे खरं असेल तर श्रीवल्लीच्या मृत्यू पाहून चाहते निराश होणार हे नक्की.

 तिसरा पार्ट नाहीच?पहिल्या भागात पुष्पा राज्यांच्या सीमेपार करताना दाखवला आहे.  पुढच्या भागात तो थेट पूर्व आशियाई देशांत रक्तचंदनाची तस्करी करताना दिसणार असल्याचंही म्हटलं जातेय. त्यामुळे हा भाग आणखीनच थरारक असेल, असा अंदाजही बांधला जात आहे.  या चित्रपटाचा तिसरा भाग आणण्याची दिग्दर्शक सुकुमार यांची इच्छा नसल्याचंही बोललं जात आहे. त्याचमुळे श्रीवल्लीचा मृत्यू यात दाखवण्याची शक्यता आहे.

टॅग्स :पुष्पाअल्लू अर्जुनरश्मिका मंदानाTollywood