Join us

‘पुष्पा’मध्ये अल्लू अर्जुनची आई साकारणारी अभिनेत्री रिअल लाईफमध्ये आहे खूप ग्लॅमरस

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2022 18:30 IST

Pushpa : ‘पुष्पा’मध्ये अल्लू अर्जुनच्या आईची भूमिका साकारणारी अभिनेत्री कोण आहे माहितीये?

 Pushpa Mother Kalpalatha  : ‘पुष्पा’ ( Pushpa ) हा अल्लू अर्जुनचा (Allu Arjun) सिनेमा रिलीज होऊन दीड महिना झाला, पण अद्याप या चित्रपटाची चर्चा सुरू आहे. अल्लू अर्जुनचा हा सिनेमा लोकांनी डोक्यावर घेतलाच. पण या सिनेमातील गाणीही डोक्यावर घेतली. अगदी सिनेमाचे डायलॉग्सही गाजलेत. चित्रपटातील कलाकारही चर्चेत आलेत. मग तो अल्लू अर्जुन असो, रश्मिका मंदाना असो की, पुष्पाचा मित्र केशव असो की पुष्पाची आई.

पुष्पाच्या आईची भावुक कहाणी मनं हेलावून सोडते. इमोशनल टच देण्यासाठी ‘पुष्पा’ या सिनेमात पुष्पराज व त्याच्या आईची इमोशनल कहाणी जोडली आहे. पुष्पा आईसोबत एका झोपडीत  राहत असतो. गावातील एका प्रतिष्ठित विवाहित पुरूषाच्या प्रेमसंबंधातून पुष्पाचा जन्म झाला असतो. वडीलांच्या मृत्यूनंतर पुष्पाला पदोपदी अनौरस म्हणून हिणवलं जातं. त्याच्या आईला अनेक अपमानास्पद प्रसंगाना सामोरं जावं लागतं. वडिलांचं नाव माहित असूनही ते आपल्या नावापुढे न लावू शकणारा  पुष्पा आणि त्याच्या आईची स्टोरी डोळ्यांत पाणी आणते.  पुष्पाच्या आईची ही भूमिका कोणी साकारली आहे, माहितीये? तर साऊथ अभिनेत्री कल्पलता (Kalpalatha) हिने.

आज याच कल्पलताबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. होय, चित्रपटात अल्लू अर्जुनच्या आईची भूमिका साकारणारी ही कल्पलता फक्त 42 वर्षांची आहे. म्हणजे अल्लू अर्जुनपेक्षा फक्त तीन वर्षांनी मोठी़ रिअल लाईफमध्येही कल्पलता दोन मुलींची आई आहे. तिच्या दोन्ही मुली नोकरी करतात.कल्पलताने 50 पेक्षा अधिक साऊथ सिनेमांमध्ये काम केलं आहे. अनेक मालिकांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. खऱ्या  आयुष्यात कल्पलता 14 वर्षांची असतानाच तिचं लग्न झालं होतं.

सोशल मीडियावर कल्पलता कमालीची अ‍ॅक्टिव्ह आहे. तिचे इन्स्टा अकाऊंट ग्लॅमरस फोटोंनी भरलेलं आहे. हे फोटो पाहून हीच पुष्पातील अल्लू अर्जुनची आई आहे, यावर क्षणभर विश्वास बसत नाही.

टॅग्स :पुष्पाअल्लू अर्जुनTollywood