Join us
Daily Top 2Weekly Top 5

Animal पाहून 'पुष्पा' ही झाला थक्क, रणबीर कपूरच्या परफॉर्मन्सवर अल्लू अर्जुन थेटच बोलला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2023 16:15 IST

'पुष्पा'ने केली 'श्रीवल्ली'ची तारीफ, म्हणाला, आतापर्यंतचा बेस्ट परफॉर्मन्स...

रणबीर कपूरच्या (Ranbir Kapoor) Animal सिनेमाची सध्या मनोरंजनविश्वात जोरदार चर्चा आहे. सिनेमाची कमाई पाहता हा यावर्षीचा ब्लॉकबस्टर सिनेमा ठरला आहे. तरी प्रेक्षकांच्या मात्र संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. 'पुष्पा' फेम अभिनेता अल्लू अर्जुननेही (Allu Arjun)  Animal पाहिला असून सिनेमाच्या संपूर्ण टीमचं भरभरुन कौतुक केलं आहे. 

अभिनेता अल्लू अर्जुनने इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर करत Animal चं आणि सर्वच कलाकारांचं गुणगान गायलं आहे. त्याने लिहिले, 'Animal सिनेमा पाहून मी थक्क झालो. अभिनंदन. रणबीर कपूरने त्याच्या अभिनयातून भारतीय सिनेमामध्ये परफॉर्मन्सची एक वेगळीच लेव्हल सेट केली आहे. खूपच प्रेरणादायी. तू पडद्यावर जी जादू केली आहेस ते पाहून मी नि:शब्द झालोय. रश्मिका, खूप सुंदर आणि अप्रतिम. तुझा आतापर्यंतचा उत्तम परफॉर्मन्स. बॉबी देओल तुमच्या इम्पॅक्टफुल परफॉर्मन्सने सर्वांनाच नि:शब्द केलंय. तुमचा खूप आदर वाटतो. अनिल कपूरजी तुमचा आणखी एक सहज आणि सुंदर अभिनय. तुमचा अनुभवच सर्वकाही सांगून जातो. तृप्ति डिमरी या नव्या मुलीने तर अनेकांचं मन जिंकलंय. असंच जिंकत राहा. सर्वच आर्टिस्ट आणि टेक्निशिन्सने उत्तम काम केलंय.'

तो पुढे लिहितो, 'आणि दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा...द मॅन...तू तर सर्वच मर्यादा तोडल्या आहेस. तुझ्या या इटेन्स कामाची तुलनाच होऊ शकत नाही.तू पुन्हा एकदा सर्वांना अभिमान वाटेल असं काम केलं आहेस. तुझ्या चित्रपटांमुळे भारचीय सिनेमाचा चेहरामोहराच पालटणार आहे. Animal ने भारतीय सिनेमांच्या यादीतील क्लासिक सिनेमात प्रवेश केलाय.'

राष्ट्रीय पुरस्कार विजेता अल्लू अर्जुनने Animal च्या संपूर्ण टीमचं भरभरुन कौतुक केलंय. सध्या अल्लू अर्जुन 'पुष्पा 2'च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. 

टॅग्स :अल्लू अर्जुनरणबीर कपूररश्मिका मंदानासिनेमा