Join us

अल्लू अर्जुन आणि सुपरस्टार राम चरण यांच्यात आहे फार जवळचं नातं, अनेकांना बसणार नाही विश्वास!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2022 16:11 IST

Allu Arjun Family : अल्लू अर्जुनचा जन्म ८ एप्रिल १९८२ मध्ये चेन्नईमध्ये झाला होता. अल्लू अर्जुन साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील सर्वात मोठ्या फिल्मी परिवारातील आहे.

साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील सुपरस्टार अल्लू अर्जुन (Allu Arjun) सध्या त्याच्या 'पुष्पा' सिनेमामुळे चांगलाच चर्चेत आहे. 'बाहुबली' सिनेमाने ज्याप्रमाणे प्रभासला नॉर्थ इंडियात रातोरात स्टार बनवलं होतं. त्याचप्रमाणे अल्लू अर्जुन आता क्लासचा नाही तर मासचा फेवरेट झाला आहे. आता त्याला मोठमोठ्या प्रोजेक्टच्या ऑफर येत आहेत आणि त्याची फी सुद्धा वाढली आहे. 

अल्लू अर्जुनचा जन्म ८ एप्रिल १९८२ मध्ये चेन्नईमध्ये झाला होता. अल्लू अर्जुन साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील सर्वात मोठ्या फिल्मी परिवारातील आहे. त्याच्या परिवाराने साऊथ फिल्म इंडस्ट्रीला अनेक मोठे स्टार्स दिले आहेत. अल्लूला बालपणापासूनच अभिनय आणि डान्सची आवड आहे. त्याने २००३ मध्ये 'गंगोत्री' सिनेमातून डेब्यू केलं होतं. त्याच्या कामाबाबत सर्वांनाच माहीत आहे. पण अनेकांना हे माहीत नाही की, चिरंजीवी आणि रामचरण हे त्याचे जवळचे नातेवाईक लागतात.

अल्लू अर्जुनचे आजोबा अल्लू रामलिंगैया हे मोठे हास्य कलाकार होते. त्यांनी १ हजारपेक्षा जास्त सिनेमात काम केले होते. त्यांना ५ मुले होती. त्यातील अल्लू अरविंद आणि सुरेखा खास आहेत. अल्लू अरविंद साऊथमधील मोठे सिने निर्माते आहेत आणि अल्लू अर्जुनचे वडील आहेत. तर सुरेखा ही अल्लू अर्जुनची आत्या आहे. 

सुरेखा यांचं अभिनेता चिरंजीवीसोबत लग्न झालं आहे. या नात्याने मेगास्टार चिरंजीवी हे अल्लू अर्जुनचे आते मामाजी लागतात. म्हणजे चिरंजीवी यांचा मुलगा रामचरण हा अल्लू अर्जुनचा नात्याने आतेभाऊ लागतो. आता चिरंजीवी यांचा भाऊ पवन कल्याणही अल्लू अर्जुनचा आते मामाजी लागतो.

इतकंच नाही तर अल्लू अर्जुनचा लहान भाऊ अल्लू सिरीशही साऊथमधील एक मोठा अभिनेता आहे. ३४ वर्षीय सिरीशने २०१३ मध्ये तमिळ-तेलुगू सिनेमा 'गौरवम' मधून साऊथ सिने इंडस्ट्रीत डेब्यू केलं होतं. म्हणजे एकप्रकारे अल्लू अर्जुन हा साऊथच्या फिल्म इंडस्ट्रीतील सर्वात मोठ्या फिल्मी परिवारातील आहे.

अल्लू अर्जुन आणि रामचरण तेजा यांच्यातील नातं आजपर्यंत अनेकांना माहीत नसेल. पण याची हिंट अनेक सिनेमात बघायला मिळाली. रामचरण तेजाच्या 'येवडू' सीरीजच्या काही सिनेमात आणि इतरही काही सिनेमात अल्लू अर्जुन पाहुणा कलाकार म्हणून दिसला आहे.  

टॅग्स :अल्लू अर्जुनराम चरण तेजाTollywood