Join us
Daily Top 2Weekly Top 5

बाप-लेकीचं नातं! आलियाने शेअर केला रणबीर आणि राहाचा क्यूट फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2024 12:36 IST

राहा कपूर तिच्या जन्मापासूनच चर्चेत आहे.

अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्ट ही बॉलीवूडची लोकप्रिय जोडी कायम चर्चेत असते. परंतु, सध्या आलिया-रणबीरपेक्षा त्यांच्या लेकीची सर्वत्र चर्चा रंगलेली असते. त्यांची लेक राहा संपूर्ण बॉलिवूडपासून ते पापाराझींपर्यंत सर्वांची लाडकी आहे. राहा कपूर तिच्या जन्मापासूनच चर्चेत आहे. तिचा क्यूटनेस पाहून तर तिचा वेगळा चाहतावर्गही तयार झाला आहे. आता पुन्हा एकदा राहा कपूर चर्चेत आली आहे. 

आलिया हिनं रणबीर कपूर आणि राहाचा एक क्यूट फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये रणबीर आणि राहा दोघेही हात पकडून चालताना दिसत आहे. राहा ही पिवळ्या रंगाच्या फ्रॉकमध्ये अगदी क्यूट दिसतेय. तर रणबीरने टीशर्ट आणि व्हाईट शॉर्ट हा लूक कॅरी केलेला आहे. आलियाने या फोटोला "कॅप्शनची गरज नाही" असं कॅप्शन दिलं आहे. 

या फोटोमध्ये दिसत असलेल्या बाप-लेकीच्या बॉन्डिंगवर नेटकऱ्यांनी लाईक्सचा वर्षाव केलाय. विशेष म्हणजे गेल्या काही दिवसांपूर्वी रणबीरने लेक राहाच्या नावाचा टॅटू काढला होता. टॅटू काढलेला फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यातूनच अभिनेत्याचं आपल्या लेकीवर किती प्रेम आहे हे दिसून येतं.

आलिया 2022 साली नोव्हेंबर महिन्यात राहाला जन्म दिला. गेल्या वर्षी ख्रिसमसला अर्थात 25 डिसेंबर 2023 रोजी राहाला पहिल्यांदा कॅमेऱ्यासमोर आणण्यात आले. राहाचा फेस रिव्हिल होताच सोशल मीडियावर तिच्या क्यूटनेसची चर्चा रंगली होती. सध्या सोशल मीडियावर राहाची सर्वाधिक क्रेझ निर्माण झाली आहे.

आलिया भट आणि रणबीर कपूर यांच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर अभिनेता सध्या 'रामायण' सिनेमाचं शूट करत आहे. तर आलियाने नुकतंच 'जिगरा' या तिच्या निर्मितीखाली बनत असलेल्या सिनेमाचं शूटिंग संपवलं आहे. रणबीर आणि आलिया दोघंही पुन्हा 'ब्रह्मास्त्र 2' आणि 'लव्ह अँड वॉर' या सिनेमांमध्ये दिसणार आहेत. 

टॅग्स :रणबीर कपूरसेलिब्रिटीबॉलिवूडआलिया भटसोशल मीडिया