७८ व्या कान्स चित्रपट महोत्सवाला (Cannes) ११ मे पासून सुरुवात झाली होती. उद्या २४ मे रोजी याचा शेवट होणार आहे. ऐश्वर्या राय, कियारा अडवाणी, उर्वशी रौतेला, जान्हवी कपूर या अभिनेत्रींनी कान्समध्ये आपला जलवा दाखवला. कियारा आणि जान्हवीची तर ही पहिलीच वेळ होती. दरम्यान अभिनेत्री आलिया भट (Alia Bhatt) सुद्धा यावेळी कान्समध्ये पदार्पण करणार आहे. ती नुकतीच कान्ससाठी रवाना झाली आहे. आता आलियाच्या कान्स लूकची चाहत्यांना आतुरता आहे.
आलिया भट यंदा कान्स डेब्यूसाठी शेवटच्या दिवशी जाणार अशीच चर्चा होती. तर ऑपरेशन सिंदूरमुळे आलिया 'कान्स'ला जाणं रद्द करेल अशीही चर्चा झाली. मात्र आता आलिया नुकतीच मुंबई विमानतळावर दिसली. ती कान्ससाठी रवाना झाली आहे. तिच्या स्टायलिश एअरपोर्ट लूकचं तर खूप कौतुक होत आहे. तिने गुची ब्रँडचा आऊटफिट परिधान केला आहे. बेज ट्रेंच कोटसोबत तिने व्हाईट फिटिंग टॉप आणि ब्लू जीन्स घातली आहे. शॉर्ट हेअर आणि डार्क एव्हिएटर गॉगलमध्ये ती सुंदर दिसत आहे. तसंच तिने स्टोरी शेअर करत विमानात वाचण्यासाठी घेतलेले पुस्तकं, मेकअप किट आणि टोट बॅगचाही फोटो तिने शेअर केला आहे. यासोबत तिने लिहिले, 'ऑफ वी गो..लॉरियल पॅरिस'.
आलिया भट २३ आणि २४ मे रोजी कान्स रेड कार्पेटवर आपला जलवा दाखवणार आहे. याआधी आलियाने मेट गालामध्ये पदार्पण केलं होतं. तेथील तिच्या लूकचं खूप कौतुक झालं होतं. आलिया लॉरियल पॅरिसची ब्रँड अँबेसिडर आहे. तर हा ब्रँड कान्सचा ऑफिशियल ब्युटी पार्टनर आहे. यासाठीच आलिया यंदा कान्समध्ये पदार्पण करत आहे.