Join us

आलिया भटने सुरु केली 'जिगरा' ची शूटिंग, Photos शेअर करत दाखवली झलक

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2023 09:51 IST

आलियाने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत.

बॉलिवूडमधील आघाडीची अभिनेत्री आलिया भटने (Alia Bhat) काही दिवसांपूर्वीच तिच्या आगामी सिनेमाची घोषणा केली. आलिया तिच्याच 'इटरनल सनशाईन' प्रोडक्शन अंतर्गत 'जिगरा' (Jigra) या सिनेमात मुख्य भूमिका साकारणार आहे. करण जोहरची धर्मा कंपनीही या सिनेमासाठी को प्रोड्युसर असणार आहे. ज्या प्रोजक्शनखाली आलियाने करिअरची सुरुवात केली होती आज त्याच प्रोडक्शनसोबत मिळून आलिया नवा सिनेमा घेऊन येत आहे. 'जिगरा' या सिनेमाच्या शूटला सुरुवात झाली असून आलियाने तिच्या सोशल मीडियावरुन शूटिंगची झलक दाखवली आहे.

आलियाने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत. यामध्ये 'जिगरा' चा क्लॅप बोर्ड, मेकअप करताना बहीण शाहीन भटसोबतचा फोटो, क्लोजअप फोटो, स्क्रीन टेस्ट, दिग्दर्शकाचा फोटो, आलियाचे सिनेमातील शूज असे काही ठराविक फोटो तिने शेअर केले आहेत. याला कॅप्शन देत तिने लिहिले,'आणि शूटिंग सुरु...जिगराच्या प्रवासाचा पहिला दिवस...आमच्या काळजाचा तुकडा तुमच्यासमोर लवकरच सादर करणार आहोत...आमचा हा प्रवास सुरळीत होवो!'

आलियाच्या या पोस्टवर सर्वांनी कमेंट करत तिला शुभेच्छा दिल्या आहेत. सध्या आलिया यशाच्या शिखरावर आहे. वैयक्तिक आणि प्रोफेशनल आयुष्यात ती पुढे जात आहे. गेल्या वर्षीच तिने मुलीला जन्म दिला. लेकीच्या जन्मानंतर तिचा 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' सिनेमा हिट झाला. तर आता धर्मासोबत मिळून ती स्वत:च्या प्रोडक्शन बॅनरखाली सिनेमा घेऊन येत आहे. ज्यामध्ये ती स्वत: मुख्य भूमिकेत आहे. 'जिगरा'साठी चाहत्यांमध्ये उत्सुकता ताणली आहे.

टॅग्स :आलिया भटबॉलिवूडसिनेमा