Join us

'प्लीज हे सगळं थांबवा'; दररोज होणाऱ्या प्रेग्नंसीच्या चर्चांमुळे वैतागली आलिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2022 16:12 IST

Alia bhatt: दररोज रंगणाऱ्या वेगवेगळ्या चर्चांमुळे आलिया वैतागली असून एका मुलाखतीमध्ये तिने नाराजी व्यक्त केली आहे.

करण जोहरच्या 'स्टुडंट ऑफ द इअर' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी आलिया भट्ट (alia bhatt)आज कलाविश्वावर राज्य करताना दिसते. आलियाने उत्तम अभिनयाच्या जोरावर कलाविश्वात तिचं भक्कम स्थान निर्माण केलं आहे. काही महिन्यांपूर्वीच अभिनेता रणबीर कपूरसोबत लग्नगाठ बांधणारी आलिया लवकरच आई होणार आहे. त्यामुळे सोशल मीडियावर तिच्या प्रेग्नंसीची चर्चा रंगताना दिसते. मात्र, दररोज रंगणाऱ्या वेगवेगळ्या चर्चांमुळे आलिया वैतागली असून एका मुलाखतीमध्ये तिने नाराजी व्यक्त केली आहे.

काही दिवसांपूर्वीच आलियाने 'मॅशबल इंडिया'ला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिने तिच्या प्रेग्नंसीविषयी रंगणाऱ्या चर्चांवर नाराजी व्यक्त केली आहे. यात माझं बेबीबंप किती आहे, मी कोणते कपडे परिधान करते, बाळाची काळजी मी कशी घेईन यावर चर्चा करणं बंद करा असंही तिने सांगितलं.

 “अरे हे फार विनोदी पद्धतीने सुरु आहे. पण, या कोणत्याच गोष्टींचा मी स्वत:वर परिणाम करुन घेत नाही. मला वाटतंय अशा न्यूज करणाऱ्यांकडे असलेला मजकूर संपला असावा त्यामुळेच माझी चर्चा सुरु केलीये. आधी माझं लग्न झालं मग त्यावरुन नवविवाहित आलिया यावर चर्चा सुरु होत्या. आता मी प्रेग्नंट आहे तर, आलियाचा प्रेग्नंसी ग्लो, आलिया बेबी बंप लपवताना,आलिया बेबी बंप  flaunt करताना या बातम्या सुरु झाल्यात, असं आलिया म्हणाली.

पुढे ती म्हणते, "या सगळ्या बातम्या, चर्चा पाहून मला एकच सांगावसं वाटतं. मी काय कपडे घातले, कधी दिसते हा माझा खासगी प्रश्न आहे. त्यामुळे मी काय परिधान करते हे मला flaunt करण्याची गरज नाही. त्यामुळे प्लीज अशा नको त्या चर्चा करणं थांबवा."

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच आलिया आणि रणबीर यांना एकत्र स्पॉट करण्यात आलं होतं. यावेळी आलियाने टाइट कपडे परिधान केल्यामुळे अनेकांनी तिला ट्रोल केलं होतं. आलिया लवकरच डार्लिंग्स या चित्रपटात झळकणार आहे. त्यामुळे सध्या ती या चित्रपटात बिझी असल्याचं पाहायला मिळतं. 

टॅग्स :आलिया भटरणबीर कपूरबॉलिवूडसेलिब्रिटीसिनेमा