Join us
Daily Top 2Weekly Top 5

स्वत: केलेली 'ती' चूक लेकीला करु देणार नाही, आलिया भटचा खुलासा; म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2024 14:58 IST

आलिया आता स्वत: आई असल्याने तिने काही अनुभव सांगितले.

बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आलिया भटला (Alia Bhatt) दीड वर्षांची लेक आहे. आलिया वैयक्तिक आणि प्रोफेशनल आयुष्य सांभाळताना दिसत आहे. काल मातृदिनानिमित्त आलियाने कुटुंबासोबतचा सुंदर फोटो शेअर केला होता. आलिया आणि तिची आई सोनी राजदान यांनी नुकतीच मुलाखत दिली. आलिया आता स्वत: आई असल्याने तिने काही अनुभव सांगितले. तसंच लेक राहासोबत कोणती चूक होऊ देणार नाही याचाही खुलासा तिने यावेळी केला. 

आलिया भट म्हणाली, "राहाने काही ना काही कला शिकावी असं मला वाटतं. तिला एक तरी वाद्य, नृत्यप्रकार आणि एक खेळ आला पाहिजे. कारण या तीनही गोष्टी भविष्यात उपयोगी येतात. यात काही चूक किंवा बरोबर नाहीए पण मला राहाने हे तीनही शिकावं असं वाटतं. तरुणपणीच तिने याची सुरुवात करावी म्हणजे तिला आवड निर्माण होईल. मी आजपर्यंत एकही वाद्य शिकू शकले नाही याची मला खंत वाटते."

ती पुढे म्हणाली, "मी खूप लवकर घर सोडलं आणि बहिणीसोबत दुसऱ्या घरात शिफ्ट झाले. तेव्हा मी २३ च वर्षांची होते. व्यस्त शूटिंग शेड्युल, कधीही कोणत्याही शहरात असणं हे फार थकवणारं असतं. आता जेव्हा मी मागे वळून पाहते तेव्हा वाटतं की आईने मला हे सगळं करु दिलं हा तिचा किती मोठेपणा आहे. मला बाबा म्हणाले होते की जोपर्यंत मी राहाला पडू देणार नाही तोवर ती स्वत: उभं राहायला शिकणार नाही. हाच आयुष्य घडवणारा पॉइंट असतो. पण मी खूप लवकर घरातून बाहेर पडले आणि ते मी राहासोबत होऊ देणार नाही."

आलिया भट आणि रणबीर कपूर यांची लाडकी राहा आता दीड वर्षांची आहे. तिच्या क्युट फोटोंवरुन चाहत्यांची नजरच हटत नाही. निळ्या डोळ्यांची ही चिमुकली राहा आजोबा ऋषी कपूर यांच्यासारखीच दिसते असंही अनेक जण म्हणतात. सध्या आलिया पुन्हा कामाला लागली आहे. तिने 'जिगरा' या सिनेमाचं शूट पूर्ण केलं आहे. शिवाय नुकतंच ती 'मेट गाला' मध्ये सहभागी झाली होती. तिथे तिच्या लूकचं खूप कौतुक झालं.

टॅग्स :आलिया भटबॉलिवूडपरिवार