Join us

'रामायण'मध्ये दिसणार नाही रणबीर-आलियाची जोडी? 'ही' अभिनेत्री साकारणार सीतेची भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2023 16:59 IST

'दंगल' फेम दिग्दर्शक नितेश तिवारी आगामी 'रामायण' सिनेमाची तयारी करत आहेत.

फिल्ममेकर नितेश तिवारी यांच्या 'रामायण' सिनेमाची इंडस्ट्रीत जोरदार चर्चा आहे. 'आदिपुरुष' ट्रोल झाल्यानंतर आता नितेश तिवारी फार जबाबदारीने पाऊल उचलत आहेत. सिनेमात रणबीर कपूर (Ranbir Kapoor) प्रभू श्रीरामाच्या भूमिकेत दिसणार हे जवळपास निश्चित झालं आहे. तर सीतेच्या भूमिकेत आलिया भटची (Alia Bhat) वर्णी लागल्याची चर्चा होती. मात्र नुकत्याच आलेल्या माहितीनुसार आलिया भटला सिनेमातून डच्चू मिळाला आहे. तर साऊथमधील आघाडीची अभिनेत्री सीतेची भूमिका साकारणार असल्याची चर्चा आहे.

'दंगल' फेम दिग्दर्शक नितेश तिवारी आगामी 'रामायण' सिनेमाची तयारी करत आहेत. सध्या सिनेमाच्या कास्टिंगची जोरदार चर्चा आहे. रावणाच्या भूमिकेसाठी साऊथ स्टार यशला भूमिका ऑफर झाली होती. मात्र नंतर त्याने नकार दिल्याचीही चर्चा होती. तर आता माध्यम रिपोर्ट्सनुसार आलिया भटही सिनेमाचा भाग नसणार आहे. आलियाच्या जागी रणबीरसोबत साऊथची आघाडीची अभिनेत्री साई पल्लवी दिसणार (Sai Pallavi) आहे. साई पल्लवीला सीतेच्या भूमिकेत बघण्यासाठी तिचे चाहते उत्सुक आहेत. यासंदर्भात मेकर्सकडून अद्याप अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

'रामायण'चे मेकर्स वर्षाच्या शेवटी सिनेमाचं शूट सुरु करण्याची योजना आखत आहेत. तर दिवाळीच्या मुहुर्तावर सिनेमासंदर्भात अधिकृत घोषणा केली जाईल अशी चर्चा आहे. सध्या रणबीर कपूर आगामी 'अॅनिमल' सिनेमात दिसणार आहे. लवकरच सिनेमाचं प्रमोशन सुरु होईल. तर साई पल्लवी आगामी 'SK 21' सिनेमात दिसणार आहे.

टॅग्स :आलिया भटबॉलिवूडरामायणसाई पल्लवी