Join us

राहाच्या जन्मानंतर ६ महिन्यात आलियाने घटवलं वजन; फॉलो केला 'हा' फिटनेस फंडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2023 13:47 IST

Alia bhatt: राहाच्या जन्मानंतर आलिया पुन्हा पहिलेसारखी फिट झाली आहे. त्यामुळे ती एका मुलीची आई असल्याचं अजिबात वाटत नाही.

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट (alia bhatt) सध्या तिच्या 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या सिनेमामुळे चर्चेत येत आहे. अलिकडेच या सिनेमातील तुम क्या मिले...हे गाणं रिलीज झालं. विशेष म्हणजे हे गाणं राहाच्या जन्मानंतर शूट करण्यात आलं होतं. परंतु, या गाण्यात आलियाला पाहिल्यानंतर तिची काही महिन्यांपूर्वीच डिलीव्हरी झाली आहे असं कोणालाही वाटणार नाही. तिने अवघ्या काही महिन्यांमध्ये तिचं वजन कमी केलं होतं.

अलिकडेच आलियाने एक व्हिडीओ शेअर केला. या व्हिडीओमध्ये तिने राहाच्या जन्मानंतर अवघ्या ६ महिन्यात तिने वजन कसं नियंत्रणात आणलं हे सांगितलं.  “राहाच्या जन्मानंतर बरोबर ६ आठवड्यांनी मी व्यायाम करायला सुरुवात केली. कारण, “तुम क्या मिले…” या गाण्याच्या शूटिंगसाठी मला ४ महिन्यात पुन्हा पूर्वी सारखंच दिसायचं होतं. राहाच्या जन्मानंतर जेव्हा पहिल्यांदा मी व्यायाम सुरु केला तेव्हा, सुरुवातीला अगदी हळूहळू व्यायाम केला.  फार अवघड किंवा हेवी व्यायाम केले नाही. स्वत:ला जमेल तितका वेळ दिला. आणि, सगळ्यात महत्त्वाचं तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखालीच मी व्यायाम केला. त्यामुळेच माझं वजन कमी झालं आहे, असं आलियाने सांगितलं.

आलियाने ६ नोव्हेंबर २०२२ मध्ये राहाला जन्म दिला. त्यानंतर पुन्हा तिने तिचा मोर्चा सिनेमांकडे वळवला आहे. आलियाचा रॉकी और रानी की प्रेम कहानी हा सिनेमा २८ जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात तिच्यासोबत अभिनेता रणवीर सिंह स्क्रीन शेअर करणार आहे. 

टॅग्स :आलिया भटसेलिब्रिटीसिनेमाबॉलिवूडरणवीर सिंग