यशराज फिल्म्सचा 'अल्फा' सिनेमाची गेल्या काही दिवसांपासून चर्चा आहे. आलिया भट आणि शर्वरी वाघ सिनेमात दमदार अॅक्शन सीन्स देणार आहेत. बॉबी देओलशी दोघांची टक्कर दाखवण्यात येणार आहे. या तगड्या कास्टचा सिनेमा पाहण्यासाठी प्रेक्षकही उत्सुक आहेत. यावर्षी डिसेंबर महिन्यात सिनेमा रिलीज होणार होता. तशी घोषणाही झाली होती. मात्र आता सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली आहे.
यश राज फिल्म्सची बहुप्रतिक्षित एक्शन एंटरटेनर ‘अल्फा’ ज्यात आता १७ एप्रिल २०२६ रोजी प्रदर्शित होणार आहे. स्टुडिओने जाहीर केले की चित्रपटाचे व्हीएफएक्स सर्वोत्तम दर्जाचे करण्यासाठी अधिक वेळ आवश्यक असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. या अॅक्शन थ्रिलरमध्ये आलियासह शर्वरी , तर महत्त्वाच्या भूमिकांमध्ये अनिल कपूर आणि बॉबी देओल दिसणार आहेत. वायआरएफ स्पाय युनिव्हर्सचा भाग असलेल्या या चित्रपटात आलिया आणि शर्वरी, बॉबी देओलविरुद्ध एका क्रूर आणि श्वास रोखून धरणाऱ्या संघर्षात उतरल्या आहेत.
वायआरएफ च्या प्रवक्त्याने सांगितले, "अल्फा आमच्यासाठी अत्यंत खास फिल्म आहे आणि आम्हाला ती सर्वात सिनेमॅटिक रुपात सादर करायची आहे. वीएफएक्सला अपेक्षेपेक्षा जास्त वेळ लागणार असल्याचे आम्हाला जाणवले. आम्ही कोणतीही कसर ठेवू इच्छित नाही, म्हणूनच ‘अल्फा’ आता १७ एप्रिल २०२६ रोजी रिलीज होईल."
'अल्फा'मध्ये आलियाचा एक नवा अॅक्शन अवतार पाहायला मिळणार आहे आणि वायआरएफ सोबत तिचा हा पहिला चित्रपट आहे. आलिया आणि शर्वरी एकत्र येऊन मोठ्या पडद्यावर अशी काही अॅक्शन दाखवणार आहेत जे भारतीय सिनेमात कधीही कोणत्याही अभिनेत्रींनी केलेले नाही — हा भारतातील पहिला महिला-नेतृत्वाचा मोठा अॅक्शन चित्रपट ठरणार आहे.
Web Summary : Yash Raj Films' 'Alpha,' starring Alia Bhatt, Shravari Wagh, and Bobby Deol, is now releasing April 17, 2026. The delay ensures top-notch VFX for this action thriller, a part of YRF's spy universe, promising never-before-seen action sequences.
Web Summary : यश राज फिल्म्स की 'अल्फा', जिसमें आलिया भट्ट, शरवरी वाघ और बॉबी देओल हैं, अब 17 अप्रैल, 2026 को रिलीज होगी। देरी यह सुनिश्चित करती है कि वाईआरएफ के जासूसी ब्रह्मांड का हिस्सा, इस एक्शन थ्रिलर के लिए टॉप-नॉच वीएफएक्स, पहले कभी नहीं देखे गए एक्शन दृश्यों का वादा करता है।