Join us

संजय लीला भन्साळींना भेटण्यासाठी आलिया कपूर पोहोचली ऑफिसमध्ये!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2023 16:54 IST

अभिनेत्री आलिया भट्ट आणि संजय लीला भन्साळी यांच्या जुहू ऑफिसबाहेर स्पॉट झाली.

अभिनेत्री आलिया भट्ट ही संजय लीला भन्साळी यांच्या जुहू ऑफिसबाहेर स्पॉट झाली. यावेळी आलिया तिच्या कारच्या मागच्या सीटवर बसलेली दिसली. ही मिटिंग कदाचित आलियाच्या पुढच्या प्रोजेक्ट संदर्भात असू शकते असा अंदाज लावण्यात येतो आहे.  मात्र, अद्याप आलिया किंवा निर्मात्यांनी याबाबत कोणतीही घोषणा केलेली नाही.

 आलिया भट्ट आणि दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांनी गंगूबाई काठियावाडी या चित्रपटात एकत्र काम केले होते. आलिया या चित्रपटाचा आत्मा होती.  या चित्रपटात आलिया गंगूबाई काठियावाडीची भूमिका साकारताना दिसली होती. गंगूबाईची भूमिका साकारण्यासाठी आलियाने प्रचंड मेहनत घेतली होती. अगदी मुंबईतला रेड लाईट एरिया म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कामठीपुऱ्यातील सेक्स वर्कर्ससोबतही तिनं वेळ घालवला होता. आता पुन्हा संजय लीला भन्साळी यांच्या चित्रपटात आलिया चाहत्यांना पाहायला मिळू शकते. 

आलिया भट्टच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले, ती सध्या तिच्या 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. 28 जुलैला रिलीज झालेला हा सिनेमा चांगली कमाई करत आहे. या चित्रपटात ती रणवीर सिंगसोबत महत्त्वाच्या भूमिकेत आहे. तर आलियाचा आणखी एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'जिगरा' असे या चित्रपटाचे नाव आहे.  या चित्रपटातील तिचा फर्स्ट लूकही समोर आला आहे.  या चित्रपटात करण जोहर आणि आलिया भट्ट पुन्हा एकदा एकत्र काम करणार आहेत. दोघे मिळून चित्रपटाची निर्मिती करणार आहेत. तर वासन बाला या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत.

टॅग्स :आलिया भटबॉलिवूडसिनेमासेलिब्रिटी