Join us

अक्षय कुमारचा मुलगा आरवची या अभिनेत्रीसोबत डेटला जाण्याची इच्छा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2018 15:22 IST

आरव बॉलिवूडच्या एका अभिनेत्री जबरा फॅन झाला असून त्याला या अभिनेत्रीसोबत डेटला जाण्याचीही इच्छा आहे. आरवने अजून बॉलिवूडमध्ये पाय ठेवला नसला तरी त्यांची फॅन फालोईंग चांगलीच मोठी आहे. 

मुंबई : बॉलिवूड खिलाडी अक्षय कुमारचा मुलगा आरव कुमार हा गेल्या काही दिवसांपासून चांगलाच चर्चेत आहे. कारणही तसंच आहे. आरव बॉलिवूडच्या एका अभिनेत्री जबरा फॅन झाला असून त्याला या अभिनेत्रीसोबत डेटला जाण्याचीही इच्छा आहे. आरवने अजून बॉलिवूडमध्ये पाय ठेवला नसला तरी त्यांची फॅन फालोईंग चांगलीच मोठी आहे. 

गेल्या काही दिवसांपासून आरवबाबत एक चर्चा होत आहे की, आरव एका बॉलिवूड अभिनेत्रीवर चांगलाच फिदा झाला आहे. केवळ १६ वर्षांचा आरव या अभिनेत्रीच्या आणि तिच्या कामाच्या प्रेमात पडला आहे. पण हे त्याचं प्रेम एकतर्फी आहे. त्याच्या मनात जागा मिळवणारी ही अभिनेत्री दुसरी तिसरी कुणी नसून अभिनेत्री आलिया भट्ट ही आहे. 

मीडिया रिपोर्टनुसार, आरव कुमारला आलिया खूप पसंत आहे. त्याने हेही मान्य केलं की, आलियाला तो एक फॅन म्हणून पसंत करतो. कारण त्याला आलियाची अॅक्टींग फार आवडते. तो तिचा इतका मोठा फॅन आहे की, त्याची आलियासोबत डेटला जाण्याची इच्छा आहे. 

आता यावर आलियाची काही प्रतिक्रिया मिळाली नाही. पण बघुया ती या स्टार फॅनची इच्छा पूर्ण करते की नाही. आरव हा अक्षयचा मुलगा असल्याने त्याच्या बॉलिवूड एन्ट्रीच्याही चर्चा नेहमी होत असतात. पण त्याने याबाबत अजून काही ठरवलं नाहीये. पण तो सध्या लेखक होण्याच्या मार्गावर आहे. काही दिवसांपूर्वी चर्चा झाली होती की, आरव एक नॉव्हेल लिहितो आहे. त्यामुळे त्याच्या या नॉव्हेलची उत्सुकताही वाढली आहे.

टॅग्स :अक्षय कुमारबॉलिवूड