Join us

अक्षय कुमारचा 'रामसेतू'मधील फर्स्ट लूक झाला आउट, चाहत्यांना विचारला हा प्रश्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2021 13:36 IST

अयोध्येत मुहूर्त शूट केल्यानंतर शेवटी अक्षय कुमारने 'रामसेतू' चित्रपटाच्या शूटिंगला सुरूवात केली आहे.

बॉलिवूडचा खिलाडी म्हणजेच अभिनेता अक्षय कुमारचा आगामी चित्रपट 'रामसेतू' गेल्या बऱ्याच काळापासून चर्चेत आहे. अयोध्येत मुहूर्त शूट केल्यानंतर शेवटी अक्षय कुमारने रामसेतू चित्रपटाच्या शूटिंगला सुरूवात केली आहे. दरम्यान चित्रपटातील अक्षय कुमारचा फर्स्ट लूक समोर आला आहे. रामसेतू चित्रपटात अक्षय कुमार आर्कियोलॉजिस्टच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटातील अक्षय कुमारचा लूक आतापर्यंतच्या चित्रपटांपेक्षा खूप वेगळा आहे. या लूकबद्दल त्याने चाहत्यांना आपले मत विचारले आहे.

अक्षय कुमारने चित्रपटातील त्याचा लूक शेअर करत लिहिले की, माझा आतापर्यंतच्या सर्वात महत्त्वाच्या चित्रपटातील एक आणि चित्रपटाच्या शूटिंगला सुरूवात झाली आहे. रामसेतूच्या शूटिंगला सुरूवाक. एका पुरातत्वशास्त्रज्ञाची भूमिका साकारते आहे. लूकबद्दल तुमचे मत जाणून घ्यायचे आहे. हे नेहमीच माझ्यासाठी महत्त्वाचे आहे. 

अक्षयच्या या पोस्टनंतर चाहत्यांनी इंस्टाग्रामवर प्रतिक्रिया द्यायला सुरूवात केली आहे. एका युजरने म्हटले की, हा लूक खूप दमदार आहे. तर दुसऱ्याने लिहिले की, आर्कियोलॉजीचा आता नवा चेहरा आहे आणि आता हे ऑसमच्या वर आहे. तर दुसऱ्या एका युजरने म्हटले की, सर विग तुम्हाला चांगला वाटत नाही. तुमचे नॅचरल केस जास्त चांगले वाटतात. तर काहींनी बेस्ट लूक असेही लिहिले आहे. एकंदरीत त्याच्या जास्तीत जास्त चाहत्यांना त्याचा हा लूक आवडला आहे. 

काही दिवसांपूर्वी रामसेतूची संपूर्ण टीम मुहूर्त शूटसाठी अयोध्याला गेले होते. यावेळी जॅकलिन फर्नांडिस, नुसरत भारूचा आणि संपूर्ण टीम उपस्थित होती.

अभिषेक शर्मा दिग्दर्शित या चित्रपटात भारतीय संस्कृती आणि ऐतिहासिका वारसांशी निगडीत कथा पहायला मिळणार आहे.

टॅग्स :अक्षय कुमारजॅकलिन फर्नांडिसनुसरत भारूचा