अभिनेता शाहरुख खान आज ६० वाढदिवस साजरा करत आहे. जगभरातील चाहते आपल्या लाडक्या अभिनेत्यावर प्रेमाचा वर्षाव करत आहेत. तसंच फिल्म इंडस्ट्रीतील शाहरुखचे सहकलाकारही त्याला शुभेच्छा देत आहेत. खिलाडी अक्षय कुमारनेही शाहरुखला हटके अंदाजात शुभेच्छा दिल्या आहेत. किंग खानसाठी त्याने खास ट्वीट लिहिलं आहे.
अक्षय कुमारनेशाहरुख खानसोबतचा जुना फोटो शेअर केला आहे. यासोबत त्याने लिहिले, "या खास दिवसासाठी तुझं खूप खूप अभिनंदन शाहरुख. ६० वर्षांचा तर तू कसाही वाटत नाहीस. शकल से ४०, अकल से १२०..., हॅपी बर्थडे दोस्त."
अक्षय आणि शाहरुख इंडस्ट्रीतील जुने मित्र आहेत. अनेकदा दोघंही अवॉर्ड फंक्शनला एका स्टेजवर आले आहेत. तेव्हा दोघांमधला मजेशीर अंदाजही लोकांनी पाहिला आहे. १९९७ साली आलेल्या 'दिल तो पागल है' सिनेमात दोघं एकत्र दिसले होते. नंतर २००७ साली आलेल्या अक्षय कुमारच्या 'हे बेबी' सिनेमात शाहरुख खानने कॅमिओ केला होता.
शाहरुख खानने आपलाय ६० वा वाढदिवस अलिबाग येथे साजरा केला. फिल्म इंडस्ट्रीतील त्याचा मोठा मित्रपरिवार अलिबाग येथे दाखल झाला होता. रात्रीपासूनच त्यांनी जंगी सेलीब्रेशन केलं. तर आता थोड्यावेळापूर्वीच शाहरुख मुंबईकडे रवाना झाला आहे. त्याच्या 'मन्नत'बंगल्याबाहेर कित्येक चाहते रात्रीपासूनच त्याची वाट पाहत आहेत.