बॉलिवूडचा सध्याचा सर्वात बिझी अभिनेता कोणता, तर अक्षय कुमार. होय, अक्षय सध्या सर्वाधिक बिझी स्टार आहे आणि का नसावा? अक्षयच्या नुकत्याच रिलीज झालेल्या सलग तीन चित्रपटांनी १०० कोटींपेक्षा अधिकची कमाई केली आहे. साहजिकच, अक्कीकडे एकापेक्षा एक दमदार प्रोजेक्ट आहेत. ‘केसरी’ हा त्याचा चित्रपट अलीकडेच प्रदर्शित झाला. या चित्रपटाचे शूटींग सुरु असतानाच त्याने ‘गुड न्यूज’चे श्ूटींग सुरू केले. आता लवरकच बॉलिवूडचा हा खिलाडी ‘सूर्यवंशी’ आणि ‘मिशन मंगल’ सारख्या चित्रपटात बिझी होणार आहे.
‘सूर्यवंशी’आधी अक्षय कुमार जर्मनीला जाऊन करणार हे खास काम!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2019 11:59 IST
‘सूर्यवंशी’चे शूटींग येत्या एप्रिलमध्ये सुरु होतेय. पण या चित्रपटाचे काम सुरु करण्यापूर्वी अक्की जर्मनीत एक थेरपी घेणार आहे.
‘सूर्यवंशी’आधी अक्षय कुमार जर्मनीला जाऊन करणार हे खास काम!!
ठळक मुद्दे‘सूर्यवंशी’चे शूटींग सुरु करण्यापूर्वी अक्षयला ही थेरपी घेणे आवश्यक आहे. कारण यादरम्यान त्याला रखरखत्या उन्हात शूट करावे लागणार आहे. ‘केसरी’साठी आधीच त्याने बराच घाम गाळला आहे. त्यामुळे तूर्तास त्याला या थेरपीची नितांत गरज आहे.