Join us
Daily Top 2Weekly Top 5

'भूत बंगला'मध्ये अक्षय कुमारसोबत स्क्रीन शेअर करणार 'हा' अभिनेता, फोटो पोस्ट करत म्हणाला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2025 14:38 IST

'भूत बंगला' या सिनेमात आणखी एका कलाकाराची एन्ट्री झाली आहे.

अक्षय कुमार आणि कॉमेडी सिनेमा हे समीकरण सुपरहिटच असतं. त्याने अनेक क्लासिक कॉमेडी सिनेमांमध्ये काम केलं आहे. आता तो आगामी 'भूत बंगला' या हॉरर कॉमेडीमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. प्रियदर्शन या सिनेमाचं दिग्दर्शन करणार आहेत. अक्षय आणि दिग्दर्शक प्रियदर्शन या जोडीने 'भूल भुलैय्या', 'हेरा फेरी', 'गरम मसाला' सारखे हिट सिनेम दिले आहेत. आता त्यांच्या 'भूत बंगला' या सिनेमात आणखी एका कलाकाराची एन्ट्री झाली आहे.

'भूत बंगला' सिनेमात अक्षय कुमार, तब्बू, परेश रावल आणि वामिका गब्बी हे मुख्य भूमिकेत असणार आहेत. नुकतंच आणखी एका अभिनेत्यानेही सेटवरील अक्षय कुमारसोबतचा फोटो शेअर केला आहे. हा अभिनेता आहे जिशू सेनगुप्ता. त्याने 'देवदास', 'गुरु', 'गोलमाल', 'बर्फी' आणि 'पिकू' अशा सिनेमांमध्ये काम केलं आहे. तो देखील अक्षयसोबत हॉरर आणि कॉमेडीचा तडका लावायला सज्ज आहे. त्याने हा ब्लॅक अँड व्हाईट फोटो शेअर केला आहे.'भूत बंगला सेटवरुन मजेशीर क्षण' असं कॅप्शन त्याने दिलं आहे.

हा फोटो पाहून नेटकऱ्यांनी कमेंट करत लिहिले, 'दोन्ही माझे आवडते कलाकार','या दोघांना एकत्र पाहायची उत्सुकता आहे','अब होगा मौत का खेल'.'भूत बंगला' पुढील वर्षी २ एप्रिल रोजी रिलीज होणार आहे. 

टॅग्स :अक्षय कुमारबॉलिवूड