Join us

'भाग मिल्खा भाग' चित्रपटात फरहान अख्तरच्या जागी दिसला असता 'हा' अभिनेता! 'या' कारणामुळे नाकारली ऑफर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2025 11:20 IST

फरहान अख्तर नव्हे 'भाग मिल्खा भाग' साठी 'हा' अभिनेता होता दिग्दर्शकाची पहिली पसंती, पण...

Bhaag Milkha Bhaag Movie: सध्या हिंदी सिनेविश्वात बॉलिवूड अभिनेता फरहान अख्तरचा‘120 बहादुर’या चित्रपटाची चांगलीच चर्चा आहे. या चित्रपटात  फरहान अख्तर  १९६२ साली रेझांग ला च्या युद्धात शौर्य गाजवलेल्या परमवीर चक्र विजेत्या  शैतान सिंह यांची भूमिका साकारत आहे. त्यामुळे चाहत्यांच्या मनात या चित्रपटाबद्दल मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.मात्र, याआधीही फरहान अख्तरने चरित्र भूमिकांमध्ये दिसला आहे. मिल्खा सिंह यांच्या जीवनावर आधारित भाग मिल्खा भाग  सिनेमात फरहान त्यांच्या भूमिकेत दिसला. हा  चित्रपट सुपरहिट ठरला. पण, तुम्हाला माहितीये का या बायोपिकसाठी फरहान अख्तर नाहीतर अक्षय कुमार दिग्दर्शकांची पहिली पसंती होता. परंतु, अभिनेत्याने तो चित्रपट नाकारला. 

२०१३ साली प्रदर्शित झालेल्या भाग मिल्खा भाग सिनेमात फरहान अख्तर,सोनम कपूर आणि दिव्या दत्ता प्रमुख भूमिकेत होते. या चित्रपटाचं दिग्दर्शन राकेश ओमप्रकाश मेहरा यांनी केलं होतं. पण, यामध्ये फ्लाईंग सिख अशी ओळख असलेल्या मिल्खा सिंग यांच्या भूमिकेसाठी अक्षय कुमारला विचारणा करण्यात आली होती. मात्र , त्याने ती ऑफर नाकारली.याचा खुलासा खुद्द अक्षयने एका मुलाखतीमध्ये केला होता. या निर्णयाचा आजही आपल्याला पश्चाताप होतो, असं अक्षयने त्यावेळी म्हटलं होतं. 

का नाकारली ऑफर?

खरंतर,भाग मिल्खा भाग या चित्रपटातील मिल्खा सिंग या भूमिकेसाठी अक्षय कुमारला विचारण्यात आले होते. पण त्यावेळी अक्षय वन्स अपॉन अ टाईम या चित्रपटात काम करत होता आणि त्याचमुळे अक्षयने भाग मिल्खा भाग या चित्रपटात काम करण्यास नकार दिला होता. 

English
हिंदी सारांश
Web Title : Akshay Kumar was first choice for 'Bhaag Milkha Bhaag' role.

Web Summary : Akshay Kumar was initially offered the role of Milkha Singh in 'Bhaag Milkha Bhaag' but declined due to scheduling conflicts with 'Once Upon a Time in Mumbaai Dobaara!'. He later regretted his decision.
टॅग्स :फरहान अख्तरअक्षय कुमारबॉलिवूडसेलिब्रिटी